निर्बंधाच्या काळात ३१ हजार जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:38 IST2021-05-20T04:38:00+5:302021-05-20T04:38:00+5:30

दुसरीकडे या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट हा १७. ५२ टक्के आहे. म्हणजे जवळपास १८ टक्के हा पॉझिटिव्हिटी रेट आहे. जिल्ह्याचा ...

31,000 people tested positive during the restriction period | निर्बंधाच्या काळात ३१ हजार जण पॉझिटिव्ह

निर्बंधाच्या काळात ३१ हजार जण पॉझिटिव्ह

दुसरीकडे या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट हा १७. ५२ टक्के आहे. म्हणजे जवळपास १८ टक्के हा पॉझिटिव्हिटी रेट आहे. जिल्ह्याचा प्रोग्रेसिव्ह पॉझिटिव्हिटी रेट हा १५.२९ टक्के आहे. त्या तुलनेत नेमक्या कडक निर्बंधाच्या काळात पॉझिटिव्हुटी रेट हा १८ टक्के राहिलेला आहे. त्यामुळे कडक निर्बंधांचा कितपत फायदा झाला, हे नेमके येत्या काळात स्पष्ट होईल. सध्या कोरोनाची दुसरी लाट ही जिल्ह्यात परमोच्च शिखरावर असल्याची कबुलीच १८ मे रोजी विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी दिली होती. त्यामुळे कडक निर्बंधांमुळे नेमका काय फायदा झाला हे प्रत्यक्ष समजण्यास किमान आणखी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

--४० टक्के मृत्यू निर्बंधांच्या काळातच--

कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण ५३२ जणांचा बुधवारपर्यंत मृत्यू झाला आहे. यापैकी २१४ जण हे कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या निर्बंध व कठोर निर्बंधांच्या ३४ दिवसांच्या कालावधीत मृत्यू पावलेले आहेत. गेल्या १४ महिन्यांत झालेल्या एकूण कोरोना मृत्यूच्या तुलनेत तब्बल ४० टक्के मृत्यू हे याच कालावधीत झालेले आहेत, हे विशेष. सुखद बाब म्हणजे या निर्बंधांच्या काळात ९९.७० टक्के बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

----

१५ एप्रिल ते १९ मे पर्यंतची स्थिती एकूण रुग्णसंख्या :- ३१,०८८

बरे झालेले रुग्ण :- ३०,९९६

मृत्यू :- २१४

एकूण चाचण्या :- १,७७,३७७

पॉझिटिव्हीटी रेट :- १७.५२ टक्के

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण :- ९९.७० टक्के

मृत्यूदर :- ०.६८ टक्के

Web Title: 31,000 people tested positive during the restriction period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.