कोरडवाहू शेती अभियानाचे ३१ लाखांचे अनुदान रखडले!
By Admin | Updated: February 19, 2016 02:20 IST2016-02-19T01:40:18+5:302016-02-19T02:20:51+5:30
सिंदखेडराजा तालु क्यातील शेतक-यांचे अनुदान रखडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत.

कोरडवाहू शेती अभियानाचे ३१ लाखांचे अनुदान रखडले!
बुलडाणा : कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत सिंदखेडराजा तालु क्यातील माळ सावरगाव येथील शेतकर्यांनी तीन कोटी रुपयांच्या विविध योजनांची कामे केली. तथापि, कृषी विभागाच्या हलगर्जी पणामुळे या शेतकर्यांचे ३१ लाख रुपयांचे अनुदान रखडल्यामुळे शे तकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात शेतकर्यांनी जिल्हाधिकार्याकडे गुरुवारी निवेदन दिले.
सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव या गावाची कोरडवाहू शेती अभियान २0१४-१५ या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. जवळपास तीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, यामध्ये २३ शेततळे, पीव्हीसी पाइप, तीन शेडनेट, ट्रॅक्टर खरेदी, ठिबक सिंचन या कामांचा समावेश आहे. तीन वर्षांंमध्ये ही कामे पूर्ण करावायाची होती. आतापर्यंंंत केवळ २३ शेततळे, आठ हजार पीव्हीसी पाइप, तीन शेडनेट, आठ ट्रॅक्टर, दोन रोटेव्हेटर, पाच ठिबक आणि तुषार संचाची कामे झाली. जवळपास ३२ लाख रुपयांचे अनुदान बाकी असून, शेततळे खोदून ठेवले तरी अनुदान मिळत नसल्यामुळे शे तकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाकडे चौकशी केली असता, अद्याप निधी आला नसल्याचे शेतकर्यांना सांगण्यात येते.
दरम्यान, त्रस्त झालेल्या माळ सावरगाव येथील संतोष कुहिरे, विष्णु कठोरे, रामेश्वर कठोरे, बबन कठोरे, सोनाजी कठोरे, गंगाधर कठोरे, आत्माराम डोंगरे या शेतकर्यांनी गुरुवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन सदर योजनेसंदर्भात माहिती दिली. एकाच वेळी एवढय़ा योजना एकाच गावात घेतल्या असतानाही संबंधित विभागाकडून सकारा त्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे माळ सावरगाववासीयांनी निवेदनात नमूद केले.