लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील आयकर अधिकारी रूपा धांडे यांच्या मुलीला एमडीएसच्या शिक्षणासाठी डी.वाय. विद्यापीठ, पुणे येथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष देऊन त्यांची ३१ लाखाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रूपा दीपक धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिल्ली येथील दृष्टी फाउंडेशनचे प्रो.प्रा. पीयूष रामचंद्र सैनी, मॅनेजर मनोज पाठक, क्लर्क अभिमन्यू, सुपरवायझर नीलिमा, पीयूष सैनी व मलेका पीयूष सैनी यांच्या जणांविरुद्ध कलम ४२०, ४०६,३४ भादंविनुसार मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
आयकर अधिकाऱ्याची ३१ लाखाने फसवणूक
By admin | Updated: June 14, 2017 01:17 IST