देऊळगाव राजा उपविभागात ३० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:49+5:302021-02-05T08:33:49+5:30

वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता योगेश बढीये यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा उपविभागामध्ये एकूण ३६ हजार ग्राहक असून, ...

30 crore electricity bill in Deulgaon Raja sub-division exhausted! | देऊळगाव राजा उपविभागात ३० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत!

देऊळगाव राजा उपविभागात ३० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत!

वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता योगेश बढीये यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा उपविभागामध्ये एकूण ३६ हजार ग्राहक असून, यामध्ये कृषिपंप १६ हजार ग्राहक आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्राहकांची संख्या ४०० असून, घरगुती वीजग्राहक १६ हजार ५००, तर वाणिज्य ग्राहकांची संख्या दोन हजारावर आहे. यामध्ये शासकीय-निमशासकीय कार्यालये यांची संख्या १४५ असून, यांच्याकडे सुमारे दोन कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. थकबाकीदारांमध्ये देऊळगाव राजा शहरातील पोलीस स्टेशन दोन लाख रुपये, ग्रामीण रुग्णालय दीड लाख रुपये, नगर परिषदेकडे पथदिवे पाच लाख, पाणीपुरवठा चार लाख रुपये, खडकपूर्णा धरणावरील पंप हाउसचे ११ लाख रुपये थकीत असून, लॉकडाऊन काळामध्ये महावितरण कंपनीला वसुलीदरम्यान शासकीय कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारे सकारात्मक सहकार्य तसेच थकबाकीपोटी रक्कम मिळाली नसल्याचे वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितले. याच बरोबर ग्रामीण भागातील ग्रामपंचायती अंतर्गत पाणीपुरवठा यांच्याकडे एक कोटी रुपये, तर पथदिवे ४५ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. वीजबिलाचा नियमित भरणा करून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी उपकार्यकारी अभियंता योगेश बढीये यांनी केले आहे.

वीज वितरण कंपनीचा अल्टिमेटम!

वीज वितरण कंपनी यांनी दिलेला टप्प्याटप्प्याने वीजबिल भरा हा अल्टिमेटम डिसेंबरपर्यंतच होता. यानंतर वीजग्राहकांनी बिल न भरल्यास त्यांची वीजजोडणी ताेडण्यात येईल, असा फतवा शासन दरबारी निघाल्यानंतर विरोधक तसेच इतर सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, राजकीय संघटना वीजग्राहकांना काही प्रमाणात दिलासा देतील काय किंवा वीजग्राहकांना आलेले पूर्णपणे वीजबिल भरावेच लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: 30 crore electricity bill in Deulgaon Raja sub-division exhausted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.