३0 जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: December 4, 2015 02:43 IST2015-12-04T02:43:15+5:302015-12-04T02:43:15+5:30

मातोळा तहसील कार्यालय तोडफोड प्रकरण.

30 cases filed against them | ३0 जणांवर गुन्हा दाखल

३0 जणांवर गुन्हा दाखल

मोताळा (जि. बुलडाणा) : मोताळा तहसीलदार यांच्या टेबलावरील काच फोडल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून ३ डिसेंबर रोजी मनसेचे माजी तालुका प्रमुख रावसाहेब देशमुखसह २५ ते ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मागील वर्षाचे पीक अनुदानाचे पैसे मिळाले नसल्याच्या कारणावरून मनसेचे माजी तालुका प्रमुख रावसाहेब देशमुखसह संतप्त शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्या टेबलावरील काच फोडल्याची घटना मंगळवारी १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी मोताळा तहसीलदार यांनी आज बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, रावसाहेब देशमुखसह २५ ते ३0 जणांनी मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तहसीलदार यांच्या कॅबीनमध्ये येऊन गैरकायद्याचा जमाव जमवून घोषणाबाजी करीत टेबलावरील काच फोडली. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून बोरखेडी पोलिसांनी जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रावसाहेब देशमुख अधिक २५ ते ३0 जणांविरुद्ध कलम १३५, पिटीअँक्ट व ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रकाश पाटील करीत आहे.

Web Title: 30 cases filed against them