शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीखाली दबून ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:31 IST

Buldhana News : अंजनी बुद्रुक येथील मनवरखाँ मस्तानखाँ पठाण (५२) यांच्या घराची भिंत ८ जून रोजी मध्यरात्रीदरम्यान पाऊस सुरू असताना पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : पावसामुळे मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे  भिंत अंगावर पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ९ जून रोजी पहाटेदरम्यान घडली. दरम्यान, या घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अंजनी बुद्रुक येथील मनवरखाँ मस्तानखाँ पठाण (५२) यांच्या घराची भिंत ८ जून रोजी मध्यरात्रीदरम्यान पाऊस सुरू असताना पडली. यामध्ये भिंतीखाली दबल्याने आशिया बी अकबरखाँ पठाण (३) ही चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तिला पहाटेदरम्यान उपचारासाठी अैारंगाबाद येथे नेत असताना बिबी गावानजीक तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या घटनेत मनवरखाँ यांच्या घरात असलेल्या सात जणांपैकी चार जण भितींखाली दबले होते. यात हसीना बी मनवरखाँ पठाण (४७), मनवरखाँ मस्तानखाँ, इम्रानखाँ मनवरखाँ (२७), हे तिघेही भिंतीखाली दबल्याने जखमी झाले होते. स्थानिकांनी त्यांना भिंतीच्या मलब्यातून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.घटनेची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर तलाठी वंदना नाईक यांनी घटनास्थळी जाऊन  पाहणी करीत पंचनामा केला. पावसामुळे घराची भिंत पडल्याने या कुटुंबाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, घरातील संसारोपयोगी साहित्यही नष्ट झाले आहे.

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणा