काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी २८ हजाराचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 07:05 PM2020-05-13T19:05:04+5:302020-05-13T19:05:30+5:30

भारतीय वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाकडून ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

28,000 fine for making waigh-bridge defects! | काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी २८ हजाराचा दंड!

काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी २८ हजाराचा दंड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या इलेक्ट्रानिक काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी अखेरीस ब्लॅक स्टोन वे-ब्रिज लॉजीस्टीक व्यवस्थापनाला २८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे भारतीय खाद्य निगम आणि ब्लॅक स्टोन वे-ब्रिज लॉजीस्टीक व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. भारतीय वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाकडून ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.‘लोकमत’ने हा प्रकार सर्वप्रथम चव्हाट्यावर आणला होता, हे येथे उल्लेखनिय!
भारतीय खाद्य निगमचे खामगाव-अकोला रस्त्यावरील गोदाम आहे. या गोदामात येणारे आणि गोदामातून शासकीय वितरणासाठी जाणाºया धान्याच्या मोजमापासाठी भारतीय वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाकडून काटा प्रमाणित करून देण्यात आला होता. मात्र, भारतीय खाद्य निगमने करारबध्द केलेल्या ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक व्यवस्थापनाने वे-ब्रिजवरील इलेक्ट्रॉनिक्स काट्याचे इंडिकेटर वैद्यमापन शास्त्र विभागाला माहिती न देता बदलवून काट्यात दोष निर्माण केला. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर भारतीय वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाचे निरिक्षक प्रदीप शेरकार यांनी २९ एप्रिल रोजी एफसीआयच्या गोदामावरील इलेक्ट्रानिक्स काटा जप्त केला. याप्रकरणी भारतीय वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाने संबंधितांना २८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे भारतीय खाद्य निगमच्या ‘मापात पाप’ असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाला आहे. दंडाच्या कारवाईला वैद्यमापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दुजोरा दिला असून गुरूवारी काही अधिकारी पुढील कारवाईसाठी एफसीआयच्या धडकणार असल्याचे समजते.
 
काट्यात आढळली होती छेडछाड!
निरिक्षकांच्या पाहणीत एफसीआयच्या गोदामावर वैद्यमापन विभागाने प्रमाणित केलेला इलेक्ट्रानिक्स काटा आढळून आला नव्हता. तसेच  इलेक्ट्रानिक्स काट्यात छेडछाड केल्याचे उघडकीस आल्यानंतर गत १४ दिवसांपासून हा काटा जप्त करण्यात आला. काट्याचे इंडीकेटर बदलवून धान्य मोजून देताना घोळ करण्यासाठीच ही छेडछाड करण्यात आली होती.

Web Title: 28,000 fine for making waigh-bridge defects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.