सात मतदारसंघात १८६ उमेदवारांचे २८0 नामांकनपत्र दाखल

By Admin | Updated: September 28, 2014 00:32 IST2014-09-28T00:32:40+5:302014-09-28T00:32:40+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील १८६ उमेदवारांनी २८0 अर्ज नामांकनपत्र दाखल केले.

280 nominations filed for 186 candidates in seven constituencies | सात मतदारसंघात १८६ उमेदवारांचे २८0 नामांकनपत्र दाखल

सात मतदारसंघात १८६ उमेदवारांचे २८0 नामांकनपत्र दाखल

बुलडाणा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0१४ साठी बुलडाणा विभागातील ७ विधानसभा म तदार संघासाठी १८६ उमेदवारांनी २८0 अर्ज नामांकनपत्र दाखल केले आहे. त्यात बुलडाणा विधानसभेसाठी २६ उमेदवारांनी ४४, मलकापूर येथे २२ उमेदवारांनी ३४, चिखली येथे २७ उमेदवारांनी ४0, सिंदखेडराजा येथे २0 उमेदवारांनी २५, मेहकर येथे ४४ उमेदवारांनी ६१, खामगाव येथे १९ उमेदवारांनी २८ तर जळगाव जामोद येथे २८ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले आहेत. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी चौधरी शंकर ओंकार बहुजन समाज पार्टी, आझहर सिकंदर खान भारिपा-बहुजन महासंघ, प्रमोद पुंजाजी कळसकर भारतीय जनता पार्टी, संजय रामभाऊ गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अशोक विश्‍वनाथ शिंदे अपक्ष, प्रमोद पुंजाजी कळसकर भारतीय जनता पार्टी, गायकवाड दादाराव बन्सी अपक्ष, डोंगरदिवे नामदेव पुंडलिक अ पक्ष, रामदास विठ्ठल भोंडे अपक्ष, विष्णुपंत तुकाराम पाटील अपक्ष, विलास शंकर तायडे अपक्ष, विष्णू दामोदर पाटील अपक्ष, हर्षवर्धन वसंतराव सपकाळ काँग्रेस, नरेश राजाराम शेळके राष्ट्रवादी काँग्रेस, भगवान रामप्रसाद बेंडवाल अपक्ष, पंढरी भगवान तायडे अपक्ष, एकनाथ ओंकार खर्चे अ पक्ष, विजेंद्र देवीदास साबळे आरपीआय, गजानन जनार्दन झगरे अपक्ष, गणेश पांडू इंगळे अपक्ष, कृष्णकांत मनोहर बगाडे आरपीआय, योगेंद्र राजेंद्र गोडे भाजपा, अ.मुस्ताक अ.वहाब अपक्ष, रामकृष्ण वासुदेव झांबरे अपक्ष यांचा समावेश आहे.

Web Title: 280 nominations filed for 186 candidates in seven constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.