२८ हजारांचा दारु साठा जप्त

By Admin | Updated: April 27, 2017 23:57 IST2017-04-27T18:53:45+5:302017-04-27T23:57:14+5:30

जानेफळ : उपविभागीय पोलिस पथकाने कळंबेश्वर येथे २७ एप्रिल रोजी दारुच्या अड्डयावर धाड टाकून २८ हजारांचा माल जप्त केला.

28 thousand liquor shops seized | २८ हजारांचा दारु साठा जप्त

२८ हजारांचा दारु साठा जप्त

जानेफळ : उपविभागीय पोलिस पथकाने कळंबेश्वर येथे २७ एप्रिल रोजी दारुच्या अड्डयावर धाड टाकून २८ हजारांचा माल जप्त केला.
जानेफळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीवरुन उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, संतोष शिंदे, पोकॉ डिगांबर चव्हाण, पंढरी जाधव, मपोकॉ वर्षा कांगणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन २७ एप्रिल रोजी रात्री कळंबेश्वर येथे शेख हारुन शेख बिबन यांच्या राहत्या घरी धाड टाकली असता त्यांच्या घरातून विनापरवाना देशी दारुचा साठा आढळून आला. याप्रकरणी कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: 28 thousand liquor shops seized