शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन अनुदानापासून बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:56 IST

बुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे जिल्हय़ातील सव्वा लाखांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील कपाशीला फटका बसला असून, १ लाख शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांचा फटका बसल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान योजना २0१६ च्या अर्जामधील त्रुटींमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ८८ हजार सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांपैकी तब्बल २८ हजार शेतकरी प्रतिक्विंटल २00 रुपये प्रमाणे मिळणार्‍या या अनुदनापासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देत्रुटींमुळे रखडले अनुदानधोरणात्मक निर्णयासाठी प्रस्ताव पाठवणार!

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे जिल्हय़ातील सव्वा लाखांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील कपाशीला फटका बसला असून, १ लाख शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांचा फटका बसल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान योजना २0१६ च्या अर्जामधील त्रुटींमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ८८ हजार सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांपैकी तब्बल २८ हजार शेतकरी प्रतिक्विंटल २00 रुपये प्रमाणे मिळणार्‍या या अनुदनापासून वंचित राहिले आहेत.त्यामुळे हा जिल्हय़ात कळीचा मुद्दा बनला आहे. त्याची धग थेट कृषिमंत्र्यापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणी आता संबंधित शेतकर्‍यांना त्रुटी दुरुस्तीसंदर्भात एक संधी देऊन त्यांना अनुदनाचा लाभ देण्याबाबत  कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी निर्देशित केले आहे.२५ क्विंटल र्मयादेत बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपयेप्रमाणे सोयाबीन अनुदान योजना २0१६ अंतर्गत  लाभ द्यावयाचा होता. त्यासाठी बुलडाणा जिल्हय़ातून ८८ हजार शेतकर्‍यांनी बाजार समितीमार्फत प्रस्ताव दाखल केले होते; मात्र यातील तब्बल २८ हजार शेतकर्‍यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळल्याने हे शेतकरी उपरोक्त निर्धारित र्मयादेत या अनुदनापासून वंचित राहिले होते.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची  ८ जानेवारी रोजी सभा झाली. या सभेमध्ये प्रकर्षाने हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. सोबतच जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडून संबंधित प्रस्तावाबाबात माहिती घेतली. सोबतच त्रुटी असलेल्या शेतकर्‍यांना त्या दुरुस्तीसाठी संधी दिली होती की नाही, याचीही शहानिशा करण्याबाबत त्यांनी विचारणा केली होती. त्यावेळी बुलडाणा जिल्हय़ातील तब्बल २८ हजार शेतकरी या अनुदान लाभासून वंचित राहिले असल्याचे समोर आले होते. 

बँकांकडूनही दिरंगाईबुलडाणा जिल्हय़ातील ५0 हजार ६८५ शेतकर्‍यांचे अर्ज या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यापोटी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास १५ कोटी १९ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. यापैकी काही रक्कम ही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा झाली आहे. अन्य शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे बँकांनीही यासाठी पुढाकार घेण्याची अवश्यकता आहे. अद्यापही तीन कोटी ८८ लाख २९ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे.

बाजार समित्यांकडूनच प्रस्ताव नाहीजिल्हय़ातील २८ हजार शेतकरी या अनुदान लाभापासून वंचित असले तरी बाजार समित्यांकडूनच यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळेही प्रशासकीय कामकाजात अडचण येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १२ हजार ७९६ शेतकर्‍यांचे प्रस्ताव अद्याप बाजार समित्यांकडून उपलब्ध झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

त्रुटी असलेल्या प्रस्तावासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव बनविण्यात येत असून, तो राज्य शासनास पाठविण्यात येत आहे. जिल्हय़ातील बाजार समित्यांमधूनच हे प्रस्ताव आलेले नाहीत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. जिल्हय़ात २८ हजार शेतकर्‍यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी