सैलानी यात्रेसाठी २८ डॉक्टरांची नियुक्ती
By Admin | Updated: February 27, 2015 01:19 IST2015-02-27T01:19:50+5:302015-02-27T01:19:50+5:30
६५ कर्मचा-यांच्या नियुक्त्या; सैलानी यात्रेसाठी दररोज फक्त दोन डॉक्टर.

सैलानी यात्रेसाठी २८ डॉक्टरांची नियुक्ती
पिंपळगाव सैलानी (बुलडाणा) : सैलानी बाबाच्या यात्रेसाठी बुलडाणा आरोग्य विभागाच्या वतीने २८ वैद्यकीय अधिकारी व ६५ कर्मचार्यांच्या बुलडाणा आरोग्य अधिकारी डॉ.कसबे यांच्या आदेशाने २६ फेब्रुवारी रोजी नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सैलानी यात्रेसाठी लाखोच्या संख्येने भाविक येतात त्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने १४ एमबीबीएस, १४ बीएएमएस, ३५ आरोग्य सेवक, १७ आरोग्य सहाय्यक, ८ आरोग्य सेविका, ५ शिपाई याप्रकारे कर्मचार्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यामध्ये दररोज १७ कर्मचारी यात्रेतील आठ नाक्यावरुन पाणी शुद्धीकरण करणार आहे. तसेच विहिरींच्या पाण्याची तपासणी करणार आहे. *यात्रेत ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा सैलानी यात्रेत रुग्णांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने २ ऑक्सीजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४ रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अँम्ब्युलन्सद्वारे बुलडाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था आहे.