२७ लाखाचा गुटखा पकडला!

By Admin | Updated: May 4, 2017 00:31 IST2017-05-04T00:31:31+5:302017-05-04T00:31:31+5:30

ट्रक व मुद्देमाल जप्त: बुलडाणा एलसीबीची चिखलीनजीक मेहकर फाट्यावर कारवाई

27 lakhs of gutkha caught! | २७ लाखाचा गुटखा पकडला!

२७ लाखाचा गुटखा पकडला!

चिखली : स्थानिक मेहकर फाट्यानजिक बुलडाणा एलसीबीने केलेल्या कारवाईत के.जी.एन. धाब्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या ट्रकमधून सुमारे २७ लाख ८१ हजार रुपयाचा गुटखा पकडण्यात यश आले आहे. या गुटख्यासोबत ट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली असून, यामुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे.
शासनाकडून कायद्यानुसार गुटखा विक्री बंद करण्यात आली असली, तरी छुप्या मार्गाने गुटखा विक्री होत आहे. बंदी काळातही अवैधपणे व सर्रास विकल्या जाणाऱ्या गुटख्यावरील ही मोठी कारवाई असून, जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांना खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीनुसार, चिखली येथील मेहकर फाट्यावर असलेल्या के.जी.एन. धाब्याच्या पाठीमागे ट्रकमध्ये गुटख्याचा मोठा प्रमाणात साठा आहे, अशी माहिती मिळाली असता त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोरेगावकर, बी.के.चव्हाण, गी.व्ही.माहुरे, एस.एल. शिरोसिया यांच्यासह घटनास्थळी पोहोचलो असता, ट्रक क्रमांक एम.एच.२८ बी.८८१६ या बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये समोरील बाजूला फ्रुट चे रिकामे कॅरेट रचलेले होते; मात्र कॅरेट हटवून पाहिल्यानंतर पांढऱ्या पोत्यांमध्ये गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रकचा दरवाचा तोडून ट्रक पोलीस स्टेशनला आणला. सखोल तपासणी अंती या पोत्यांमध्ये विशिष्ट कंपनीच्या गुटख्याची ५० पोती आढळून आली. एका पोत्यामध्ये ६ बँग याप्रमाणे एकूण ३०० बॅग व एका बॅग मध्ये ५५ पुडे असे एकूण १६५०० पुडे व त्याची बाजार किंमत २७ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा आणि ३ हजार रुपये किमतीचे ७२ मोठे कॅरेट आणि ट्रक असा सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोरेगावकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना अन्न सुरक्षा अधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, सदर गुटख्याचा ट्रक हा निसार हाजी अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जागेत सापडल्यामुळे निसार हाजी अब्दुल कादर यास मुख्य आरोपी करण्यात आले असून, त्याच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ नुसार कारवाई करणार असल्याचे सांगून सदर प्रकरणातील आरोपी निसार हाजी फरार झाल्याचे त्यांनी सांगितले.

४० लाखांचा माल जप्त
तपासात विशिष्ट कंपनीच्या गुटख्याची ५० पोती आढळून आली. एका पोत्यामध्ये ६ बँग याप्रमाणे एकूण ३०० बॅग व एका बॅगमध्ये ५५ पुडे असे एकूण १६५०० पुडे व बाजार किंमत २७ लाख ८१ हजार रूपयांचा गुटखा आणि ३ हजार रूपये किमतीचे ७२ मोठे कॅरेट आणि ट्रक असा सुमारे ४० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: 27 lakhs of gutkha caught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.