शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

२५९ युवकांनी रक्तदान करून केले शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST

बुलडाणा : शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ९० व्या शहीद दिनानिमित्त २३ मार्च रोजी देशव्यापी रक्तदान महाशिबिराचे आयोजन ...

बुलडाणा : शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ९० व्या शहीद दिनानिमित्त २३ मार्च रोजी देशव्यापी रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त गर्दे वाचनालयाच्या सभागृहात २५९ दात्यांनी रक्तदान करून या वीर शहिदांना अभिवादन केले.

निमा संघटना, आम्ही बुलडाणेकर, आयुर्वेद मेडिकल कॉलेज, आदिती अर्बन, जिल्हा पत्रकार संघ, शिवजागर मंच, लेवा पाटीदार युवा मंच, राजर्षी शाहू पतसंस्था, संत रविदास सेवा समिती, शिवशक्ती ग्रामीण पतसंस्था, स्व. संतोषराव काळे सेवा मंडळ, दुधा, गर्दे वाचनालय आदी सेवाभावी संस्थांच्या वतीने या संवेदना भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात विविध स्तरांतील नागरिकांनी रक्तदान करून बुलडाणेकरांची संवेदना जागृत केली आहे. सर्वप्रथम प्रशांत इंगळे यांनी रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद दिला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रक्तसंकलनाचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय, जीवनधारा ब्लड बँक व लीलावती ब्लड बँक यांच्या चमूने केले.

गर्दे वाचनालय परिवाराने रक्तदान संवेदना शिबिराला मोफत सभागृह देऊन रक्तदात्यांची बसण्याची व्यवस्था केली. या कार्यात उदय देशपांडे, अ‍ॅड. अमोल बल्लाळ, ग्रंथपाल नेमीनाथ सातपुते यांच्या चमूने संपूर्ण शिबिरात विशेष सहकार्य केले, तसेच कारागृह अधीक्षक अरविंद आवळे, चालक बबन खंडारे व कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान केले. महिला फोरमच्या डॉ. वैशाली पडघान, डॉ. माधवी जवरे, मनीषा शिंगणे, साधना ढवळे, पुष्पा गायकवाड, सुवर्णा देशमुख, श्रीमती जोशी यासह तीस महिलांनी रक्तदान केले.

शिबिरासाठी संवेदना महारक्तदान शिबिराचे संयोजक डॉ. राजेश्वर उबरहंडे, मार्गदर्शक डॉ. गजानन पडघान, निमा जिल्हाध्यक्ष दिनेश अग्रवाल, डॉ. प्रशांत ढोरे, डॉ. अजय खर्चे, डॉ. रवींद्र वाघमारे, डॉ. प्रवीण पिंपरकर, डॉ. राखी कुळकर्णी, डॉ. वैशाली पडघान, संजय खांडवे, सागर काळवाघे, प्रशांत खाचणे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, डॉ. आशिष मुळे, डॉ. कांचन अंभोरे, सुरेश देवकर, डॉ. भागवत वसू, डॉ. प्रमोद डव्हळे, तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिराला आयएमएचे डॉ. शोन चिंचोले, डॉ. विकास बाहेकर, कारागृह अधीक्षक अरविंद आवळे, माजी आ. विजयराज शिंदे, अ‍ॅड. जयसिंग देशमुख, पत्रकार संघाचे सरचिटणीस नितीन शिरसाट, जगदेवराव बाहेकर, डाॅ. छाया महाजन, नगरसेवक अरविंद होंडे, दीपक सोनुने, अंजली परांजपे, गायत्री सावजी, सुवर्णा देशमुख, मंदार बाहेकर, दामोदर बिडवे, डी.आर. माळी, संदीप शेळके, विनोद बेंडवाल यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.