टाकळी येथील ‘उपक्रमशील’ शाळेला २५ हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:12 IST2017-09-18T19:11:57+5:302017-09-18T19:12:15+5:30

येथील कापड व्यावसायिकाने आयएसओकडे वाटचाल करणाºया तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथील जि. प. म. प्राथमिक शाळेला २५ हजाराची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

25 thousand help to the 'ventricle' school in Takli | टाकळी येथील ‘उपक्रमशील’ शाळेला २५ हजाराची मदत

टाकळी येथील ‘उपक्रमशील’ शाळेला २५ हजाराची मदत

ठळक मुद्देविद्यार्थी भारावलेकापड व्यावसायिकाने जोपासली सामाजिक बांंधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा (बुलडाणा ):  येथील कापड व्यावसायिकाने आयएसओकडे वाटचाल करणाºया तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथील जि. प. म. प्राथमिक शाळेला २५ हजाराची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचा लोकसहभागातून विकास केला जात आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा एकापेक्षा एक गुणवत्तेचे पाऊल पुढे टाकत आहेत. शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन समिती, शिक्षण विभाग व ग्रामस्थांसह लोकसहभागातून अनेक शाळा डिजिटल झाल्या असून, चिमुकल्यांच्या मुखातून अस्सल इंग्रजी शब्द बाहेर येत आहेत. टाकळी वाघजाळ येथील जि. प. मराठी प्राथमिक शाळासुद्धा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नावारूपास आली आहे. सदर शाळा आयएसओ मानांकनाच्या अंतिम टप्प्यात आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना अडचणी येणार नाहीत, यासाठी शाळेमध्ये अत्यावश्यक सुविद्या उपलब्ध करून घेण्यासाठी मुख्याध्यापक अशोक राजनकर लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. यावेळी त्यांनी शाळेतील ७७ मुलांना दर्जेदार बुट, मोजे, टाय, ओळखपत्र व ज्या मुलांना शासनाकडून गणवेश मिळत नाही अश्या १६ मुलांना गणवेश असे जवळपास २५ हजारांचे साहित्य उपलब्ध करून दिले.

Web Title: 25 thousand help to the 'ventricle' school in Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.