२५ हजारांचा गांजा पकडला

By Admin | Updated: May 7, 2015 01:17 IST2015-05-07T01:17:19+5:302015-05-07T01:17:19+5:30

चिखली येथील घटना; आरोपीस मुद्देमालासह अटक.

25 thousand ganja caught | २५ हजारांचा गांजा पकडला

२५ हजारांचा गांजा पकडला

चिखली (जि. बुलडाणा) : स्थानिक पंचमुखी महादेव मंदिराजवळ चिखली पोलिसांनी गोपनीय माहितीवरून पाच किलो गांजासह आरोपीस अटक केली. त्या पूर्वी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. गांजाची खेप घेऊन मोटारसायकलने येत असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी एकूण ५५ हजार १00 रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिखलीचे ठाणेदार व्ही. एच. राजपूत यांना ६ मे रोजी खामगाव मार्गाने चिखलीकडे एक इसम मोटारसायकलवर गांजा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे येथील पंचमुखी महादेव मंदिराजवळ पोलिसांनी पंच साक्षीदार म्हणून नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत नाकाबंदी केली. दरम्यान, दुपारी ३ च्या सुमारास स्थानिक शाहूनगरातील एकनाथ लक्ष्मण चव्हाण (२१) हा हीरो डिलक्स मोटारसायकलने (एम.एच. २0, एएक्स २३३७) चिखलीकडे येत होता. त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे पाच किलो गांजा आढळून आला. यावरून पोलिसांनी त्यास अटक केली. २५ हजार १00 रुपयांचा पाच किलो गांजा व ३0 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ५५ हजार १00 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोकुळ भोई यांच्या तक्रारीवरून आरोपी एकनाथ चव्हाणविरुद्ध भादंविच्या कलम २0, २२ एनडीपीसी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 25 thousand ganja caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.