२५ हजार भाविकांनी घेतले दर्शन
By Admin | Updated: November 6, 2014 23:10 IST2014-11-06T23:10:17+5:302014-11-06T23:10:17+5:30
खामगाव तालुक्यातील घाटेपुरी येथील कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त उत्सव.

२५ हजार भाविकांनी घेतले दर्शन
खामगाव (बुलडाणा): शहरापासून नजीकच असलेल्या घाटपुरी येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे प्राचीन काळातील कार्तिक स्वामी मंदिर आहे. हे मंदिर कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज महिलांसाठी खुले करण्यात आले होते. वर्षातून फक्त एकदाच महिलांच्या दर्शनाकरि ता मंदिर खुले होत असल्याने आज या ठिकाणी महिलांसह भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल २५ हजाराच्यावर भाविकांनी येथे दर्शन घेतले.
भाविकांना दर्शनासाठी त्रास होऊ नये म्हणून प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. वर्षभर हे मंदिर बंद असते. फक्त कार्तिकीलाच हे मंदिर उघडले जाते. मंदिर दर्शनासाठी खुले करण्यापूर्वी मंदिरात अभिषेक करण्यात आला.