शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील २५ टक्के लोकसंख्या मानसिक विकारात राहील- गोडबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 17:38 IST

२०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले.

बुलडाणा: क्रुझमधील सुरक्षा रेलींग ओलांडून मिसेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेल्फी काढल्याचा मुद्दा सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत असतानाच सेल्फायटिस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डरसारखे आजार आता समोर येत असून २०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले.बुलडाणा येथे २१ आॅक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानाच्या निमित्ताने ते बुलडाण्यात आले होते. यावेळी स्थानिक बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सोशल मिडियात वाढता सेल्फीट्रेन्ड, फेसबुक अ‍ॅडिक्ट आणि वतर्ममानस्थितीत भरकटलेला युवक या मुद्यांना धरून त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. वाढता चंगळवाद हा अनेक बाबींसाठी कारणीभूत असून भरकटलेला आजचा युवक, तरुण वर्ग हा आई-वडिलानी आपल्या पाल्यामध्ये मुल्यांची रुजवणूक करणे गरजेचे झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसिद्धी आणि पैसा यामुळे आजची मुले भरकटू लागली असून दुसर्याशी तुलना केल्याने समस्या निर्माण होत आहे. आपण तंत्रज्ञानाच्या विरोधात नसून ते एक साधन म्हणून उपयुक्त आहे. पाश्चिमात्य संस्कृती आज आपण स्वीकारत आहोत. यूज आणि थ्रो ही संकल्पना आजच्या तरूण पिढीत रुजल्या गेल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यातूनच २०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्या ही मानसिक विकारात राहील, असे वक्तव्य त्यांनी केले.दुसरीकडे दिवसातून किमान तीनदा डीपी बदलणेही मानसिक विकारात मोडते. त्यातून आता नव्याने सेल्फायटीस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डर सारखे आजार समोर येत आहेत. आज सोशल मिडीयाचा वापर थिल्लरपणे चालू आहे. वास्तविक सोशल मिडियाने अनेक चळवळी उभ्या केल्या. ‘मीटू’, जेष्ठ नागरिकांची चळवळ अशा अनेक चळवळी उभ्या राहल्या आहेत. ‘मीटू’ चे संदर्भ आणि अन्वयार्थ काहीसे वेगळे आहेत. मात्र सोशल मिडीयामध्ये ताकद आहे. हे तंत्रज्ञान सकारात्मक दृष्टीकोणातून साधन म्हणून वापरणे योग्य आहे. परंतू त्याच्या अधीन जाणे तितकेसे योग्य नाही, असे ही अच्यूत गोडबोले म्हणाले.‘ईव्हीएम हॅक होऊ शकते पण हियर नाही!’‘ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते पण ते हियर होईल की नाही याबाबत सांगता येणार नाही!’ असे वक्तव्य एका प्रश्नाला उत्तर देताना अच्यूत गोडबोले यांनी देऊन पत्रकार परिषदेत हशा पिकविला. लोकशाहीत जर अशा मुद्द्यावरून शंका निर्माण होत असले तर त्या ठिकाणी बॅलेटपेपरवच निवडणूक घेतली जावी. लोकशाहीचा खेळ कशाला. यामध्ये आपण सत्ताधारी पक्षाला दोष देत नाही. विरोधक त्या मुद्द्यावर बोंब मारताहेत. अशा मुद्द्यांशी आपल्याला घेणे नाही. तसेच मिळणारी मते ही एका विशिष्ट पक्षालाच मिळताहेत याबाबतही अपाण सांगू शकत नाही. मात्र जेथे शंका आहे तेथे कशाला खेळ, असे ते म्हणाले.निश्चलीकरण योग्य पण घाईत घेतलेला निर्णयनोटबंदीचा( निश्चलीकरण) घेतलेला निर्णय अथवा कल्पना योग्य आहे. परंतू तो निर्णय घाईघाईत घेतला गेला. नोटांमध्ये ६.८ टक्के पैसा हा काळा पैसा आहे. बाकी काळा पैसा हा प्रॉपर्टी, सोने आणि परदेशात आहे. हजाराची नोट बंद करून दोन हजाराची काढणे तर्कसंगत वाटत नाही. त्यापेक्षा हजाराची नोट बंद करून त्याजागी तेवढ्याच मुल्ल्याच्या ५०० रुपयांचा अतिरिक्त नोटा आणल्या गेल्या असत्या तर अधिक बरे झाले असते. एटीएममधील सॉफ्टवेअरमध्ये जुजबी बदल करून ते फिटअप करता आल्या असत्या. रांगेमध्येही त्यामुळे उभे राहण्याचे काम नव्हते, असे गोडबोले म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य