25 crores sanctioned for Sindhkhed Raja development plan - Shashikant Khedekar's information | सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर - शशिकांत खेडेकर
सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर - शशिकांत खेडेकर

ठळक मुद्देपुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाची अखेर मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा :  मातृतिर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपायंच्या कामांना पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे विकास आराखड्यातंर्गत सिंदखेड राजाताली स्मारकांच्या जतन व दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
सिंदखेड राजा येथे यासंदर्भात शिवसेनेचे आ. शशिकांत खेडेकर यांनी स्थानिक विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन गुरूवारी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत अतीष तायडे, सतीष काळे, संजय मेहेत्रे, दिलीप आढाव, प्रकाश मेहेत्रे, पींटू पवार, राजू आढाव, दीपक बोरकर, अक्षय केरळकर यांच्यासह अन्य शिवसेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ऐतिहासिक सिंदखेड राजा शहर व येथील स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने शेगाव तिर्थस्थळ विकास आराखड्याच्या धर्तीवर सिंदखेड राजा विकास आराखड्याची घोषणा केली होती. परंतू निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यासाठी पाठपुरावा केल्यामुळेच या विकास आराखड्यातील ३११ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपयांच्या निधीस पाच जानेवारी २०१८ रोजी त्यास मंजुरी मिळाली असल्याचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सांगितले. सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत सिंदखेड राजा येतील पाच राज्य संरक्षीत स्मारकांच्या जतन व दुरुस्तीच्या कामांना ही मान्यता देण्यात आली असल्याचे आ. खेडेकर म्हणाले. पाच जानेवारी रोजी पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदत गर्गे यांनी त्यासंदर्भातील पत्रच दिले आहे.
या निधीमधून लघुजीराव जाधव राजवाड्यासाठी चार कोटी १४ लाख, ११ हजार १५५, सावकारवाड्यासाठी एक कोटी ९८ लाख, २३ हजार २७२, रंगमहालासाठी दोन कोटी १२ लाख ७ हजार ३५१, नीळकंठेश्वर मंदिरासाठी  एक कोटी २७ लाख ८८ हजार, ८३८, काळाकोटसाठी तीन कोटी ४४ लाख,६८ हजार ५५९ रुपये जतन व संवर्धनासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे आ. शशिकांत खेडेकर म्हणाले.

Web Title: 25 crores sanctioned for Sindhkhed Raja development plan - Shashikant Khedekar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.