निवडणूक प्रक्रियेवर २४३ आक्षेप
By Admin | Updated: February 11, 2015 01:15 IST2015-02-11T01:15:17+5:302015-02-11T01:15:17+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रभाग रचना व आरक्षणावर हरकत.

निवडणूक प्रक्रियेवर २४३ आक्षेप
बुलडाणा : जुलै ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातल्या आहे. निवडणुकीसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.यावर दावे व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले होते. ६ ते ९ फेब्रुवारी अशा तीन दिवसांत २४३ लोकांनी आपले आक्षेप नोंदविले.
कार्यकाळाची मुदत संपणार्या जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींसाठी जुलै ते डिसेंबर या कालावधीत टप्प्या-टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा सर्व कार्यक्रम २९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय, तहसील, पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालयात राबविण्यात आला. ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षणावरील हरकती, सूचना व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात ५ फेब्रुवारीपर्यंंत स्वीकारण्यात गेल्या. ६ ते ९ फेब्रुवारी तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात चालेल्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील १३ तालुक्यातील २४३ लोकांकडून नमुना ह्यबह्णवर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आलेल्या आक्षेपाची संपूर्ण चाचपणी करून जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्णय घेतला जाईल. यानंतर १३ फेब्रुवारी रोजी नमुना ह्यअह्ण प्रसिद्ध केला जाईल. यावर आक्षेप घेता येणार नाही, अशी माहिती श्रीकांत देश पांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
* तीन दिवस चालली प्रक्रिया
जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत ६ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद, संग्रापुर, शेगाव, खामगाव, ७ फेब्रुवारी रोजी मेहकर, देऊळगावराजा, लोणार, सिंदखेडराजा तसेच ९ फेब्रुवारीला मोताळा, नांदुरा, चिखली, मलकापूर, बुलडाणा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर दावे व आक्षेप स्वीकारण्यात आले.