२४ हजार मतदार वाढले

By Admin | Updated: July 5, 2014 01:01 IST2014-07-05T00:20:07+5:302014-07-05T01:01:01+5:30

निवडणूक आयोगाची नोंदणी पूर्ण : मतदार संख्या १८ लाखांवर

24 thousand voters increased | २४ हजार मतदार वाढले

२४ हजार मतदार वाढले

बुलडाणा : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात १८ लाख १४ हजार ३७१ एवढी मतदार संख्या होती. मागील दोन महिन्यात नव्याने २४ हजार ७६८ नवीन मतदारांनी नाव नोंदणी केल्याने आता जिल्ह्याची मतदार संख्या १८ लाख ३९ हजार १३९ एवढी झाली आहे.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात २१ व २२ जून आणि २८ व २९ जून या दिवशी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष मोहीम राबविली. यादरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील २४ हजार ७६८ नवीन मतदारांनी आपले नावे मतदार यादीत नोंदविली. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत २४ हजार मतदारांची वाढ झाली.

Web Title: 24 thousand voters increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.