देऊळगाव राजात २४ किलाे गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By संदीप वानखेडे | Updated: September 10, 2023 21:49 IST2023-09-10T21:49:36+5:302023-09-10T21:49:54+5:30
३़ ४९ लाखांचा ऐवज जप्त

देऊळगाव राजात २४ किलाे गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
देऊळगाव राजा : शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत २४ किलाे ३०० ग्रॅम गांजासह ३ लाख ४९ हजारांचा ऐवज जप्त केला़ या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे़.
देऊळगाव राजा शहरातील संजय नगरात गांजाची विक्री हाेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून २४ किलाे गांजासह माेबाइल, दुचाकी व इतर साहित्य असा ३ लाख ४९ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त केला़ .
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा महामुनी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने करण्यात आली़ कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे पीएसआय सचिन कानडे, हेकाॅ. दिगंबर कपाटे, पाेलिस काॅन्स्टेबल दीपक वायाळ, देऊळगाव राजाचे ठाणेदार संताेष महल्ले, पीएसआय भारत चिरडे, हेकाॅ. विश्वनाथ काकड, सै़ मुसा, एनपीएस गणेश जायभाये, समाधान बंगाळे आदींसह इतरांनी केली.