खामगावातील अतिक्रमकांना २४ तासाचा 'अल्टीमेटम'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 16:50 IST2020-01-28T16:50:22+5:302020-01-28T16:50:47+5:30
नोटीस मिळाल्यापासून २४ तासाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

खामगावातील अतिक्रमकांना २४ तासाचा 'अल्टीमेटम'
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नगर पालिकेच्या मालकीच्या भुखंडावर अतिक्रमण करणाºया शेकडो अतिक्रमकांना नगर पालिका प्रशासनाच्यावतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून २४ तासाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
खामगाव शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि मैदानांना अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येत आहे. नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करणाºया अनेक अतिक्रमकांना महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८०, १८१ नुसार तात्काळ अतिक्रण काढण्यासाठी नोटसी बजावण्यात आल्या आहेत. २४ तासाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास नगर पालिका प्रशासनाकडून पोलिस संरक्षणात अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
मुख्य रस्त्यावरील अतिक्रमकांचा समावेश!
शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमकांना तसेच विविध व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर परिषद परिसर, बसस्थानक, पंचायत समिती, टॉवर चौक, टिळक चौक, गांधी चौक, महावीर चौक परिसरातील अतिक्रमकांचा समावेश आहे.