२३ शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे बुडविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:03+5:302021-02-05T08:34:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत विकलेल्या शेतमालाचे पैसे बुडवून दोन व्यापाऱ्यांनी पोबारा केला. तब्बल २३ ...

२३ शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे बुडविले!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत विकलेल्या शेतमालाचे पैसे बुडवून दोन व्यापाऱ्यांनी पोबारा केला. तब्बल २३ पेक्षा अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील धाड आणि बुलडाणा तालुक्यातील तब्बल १० गावांतील २३ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती बुलडाणाचे अनुज्ञप्ती धारक रविकांत ज्ञानेश्वर खडके, ज्ञानेश्वर गणपत खडके यांना कोरोना लॉकडाऊन कालावधीत माळवंडी येथील रविकांत खडके यांच्या शेतातील गोदामात माल विकला आहे. शेतकऱ्यांनी सुमारे ४१ लक्ष रुपयांचे हरभरा आणि सोयाबीन व्यापाऱ्याला विकले आहे. माल खरेदी केल्यापासूनच व्यापारी फरार झाला असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस या प्रकरणी २ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहेे. न्याय न मिळाल्यास सुरेश भाऊराव चव्हाण यांच्यासह सुमारे ३१ शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.