पळून गेलेल्या २२ मुली, ७ मुलांना केले पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST2020-12-29T04:33:22+5:302020-12-29T04:33:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गंत घरातून पळून गेलेल्या तसेच भीक मागणाऱ्या व कचरा गाेळा करणाऱ्या ...

पळून गेलेल्या २२ मुली, ७ मुलांना केले पालकांच्या स्वाधीन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गंत घरातून पळून गेलेल्या तसेच भीक मागणाऱ्या व कचरा गाेळा करणाऱ्या मुलांचा शाेध घेण्यात येत आहे. सन २०१४ ते २०२०पर्यंत घरातून पळून गेलेली ७ मुले आणि २२ मुलींचा बुलडाणा पाेलिसांनी शाेध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. या शोध मोहिमेदरम्यान मुलांचे आश्रमगृह, रेल्वेस्थानक, बसस्थानके, रस्त्यावर भीक मागणारी तसेच कचरा गोळा करणारी ७२ मुले व ४१ मुलींचा शाेध घेण्यात यश आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र, राज्य मुंबई यांचे आदेशाने महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान - ९ महाराष्ट्र शोध मोहीम’ हे अभियान राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, खामगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणाचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणाचे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव अंभोरे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल प्रभू परिहार, पोलीस अंमलदार श्रीकांच चिंचोले, दीपक वायाळ, पोलीस अंमलदार कल्पना हिवाळे, अनुराधा उबरहंडे व चालक पोलीस नाईक योगेश सुरूशे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस स्थानकांच्या अभिलेखावरील सन २०१४ ते २०२० या कालावधीत हरवलेली व पळून गेलेली १८ वर्षाखालील मुले, मुलींचा या अभियानदरम्यान शोध सुरू केला आहे. आतापर्यंत या पथकाने ७ मुले व २२ मुलींचा यशस्वी शाेध घेतला आहे. तसेच मुलांचे आश्रमगृह, रेल्वेस्थानक, बसस्थानके, रस्त्यावर भीक मागणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, मुली यांचा शोध घेत असताना ७२ मुले व ४१ मुली सापडल्या आहेत. या शाेध माेहिमेदरम्यान सापडलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.