शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील २१ हजार कर्मचाऱ्यांंचा संपात सहभाग; कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 15:19 IST

बुलडाणा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांनी पुकारलेल्या संपाला बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास २१ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद तथा अन्य शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांनी ११ जुलै रोजीच या संपाची हाक दिली होती. सोबतच राज्य शासनास यासंदर्भाने ...

ठळक मुद्देपरिषदेमधीलही साडेबारा हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ग्रामीण ते शहरी भागातील सर्वच शासकीय कामे ठप्प झाली आहे.ग्रामपातळीवर ग्रामसेवकांनीही त्यांचे कामकाज बंद केल्याने ग्रामीण भागातील कामकाजही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.

बुलडाणा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांनी पुकारलेल्या संपालाबुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास २१ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद तथा अन्य शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांनी ११ जुलै रोजीच या संपाची हाक दिली होती. सोबतच राज्य शासनास यासंदर्भाने संपाची नोटीसही बजावली होती. त्यानुषंगाने सात ते नऊ आॅगस्ट दरम्यान हा संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जवळपास सात हजार कर्मचारी संपात सहभागी झाले असून वनविभाग, महसूल, कृषी, कोषागार, सांख्यिीकी, हिवताप निर्मूलनसह अन्य कार्यालयातील शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. या कर्मचारींनी दिवसभर कामबंद आंदोलन केले. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत छोटेखानी द्वारसभा घेत संपा संदर्भातील पुढील भूमिकसंदर्भात सविस्तर चर्चा केली असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे तेजराव सावळे यांनी सांगितले.दुसरीकडे जिल्हा परिषदेमधीलही साडेबारा हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ग्रामीण ते शहरी भागातील सर्वच शासकीय कामे ठप्प झाली आहे. मिनी मंत्रालयातंर्गतचे १२ हजार ५०० कर्मचारी संपात सहभागी आहेत. यात साडेसात हजार शिक्षक, दोन हजार ५०० अन्य कर्मचारी तथा कारकून असे मिळून १२ हजार ५०० कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पी. एम. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हा परिषदेमध्ये संघटनेच्या सर्व कर्मचार्यांनी सकाळी एकत्र येत राज्य शासनाच्या कर्मचार्यांच्याप्रती असलेल्या धोरणाचा निषेध करीत द्वार सभा घेतली. या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांतील कामे ठप्प पडली आहे. मीनी मंत्रालयातंर्गत शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, वित्त, आस्थापनासह सर्वच ठिकाणची कामे प्रभावीत झाली आहे. ग्रामपातळीवर ग्रामसेवकांनीही त्यांचे कामकाज बंद केल्याने ग्रामीण भागातील कामकाजही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.

शैक्षणिक नुकसान भरून काढणारसंपात जिल्हा परिषदेतील साडेसात हजार शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यामुळे शाळाही बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड होत असतानाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी पुढील काळात अनुषंगीक अध्यापन करून ही कमी भरून काढण्याचे आश्वासनच यापूर्वी शिक्षक संघनांनी राज्यशासनास दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पी. एम. जाधव यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारीEmployees Union of Z Pजिल्हा परिषद कर्मचारी युनिअनStrikeसंप