दंगलप्रकरणी २१ जणांना अटक

By Admin | Updated: October 16, 2014 23:36 IST2014-10-16T23:36:08+5:302014-10-16T23:36:08+5:30

खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथील दगडफेक प्रकरण, २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

21 people arrested for rioting | दंगलप्रकरणी २१ जणांना अटक

दंगलप्रकरणी २१ जणांना अटक

खामगाव (बुलडाणा) : शहरालगत असलेल्या सजनपुरी येथे काल १५ ऑक्टोबरचे रात्री दगडफेक होऊन एका तरुणासह पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली होती. तसेच यावेळी शेकडोंच्या संख्येत असलेल्या जमावाकडून टपर्‍यांची तोडफोड करण्याचा प्रकारही घडला होता. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी २७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन २१ जणांना काल रात्रीच अटक केली. सध्या सजनपुरी परिसरात तणावपूर्ण शांतता असून, तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सजनपुरी येथे शांती उत्सवानिमित्त जगदंबा देवीची स्थापना करण्यात आली आहे. काल रात्री देवीचे मंडपासमोर कीर्तन होते. याच परिसरातील एका समाजाच्या व्यक्तिने एका महिलेशी अश्लील बोलून शिवीगाळ केली. त्यामुळे उपस्थित काहींनी त्याला मारहाण करुन त्याच्या मागे धावले असता त्याने आपल्या मोहोल्ल्यात जावून गैरकायदा मंडळी जमवून दगडफेक केली. या दगडफेकीत शंकर गुजरीवाल तसेच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोकाँ प्रवीण इंगळे हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची तेथे अधिक कुमक गेली असता त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. यामुळे सजनपुरी सोब तच दाळफैल भागात व शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गब्बू ऊर्फ किशोर गुजरीवाल (वय १९) रा.सजनपुरी यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी जियाउल्ला खान अमानउल्ला खान, युसूफ खान अनामत खान, शाहिद खान असर खान, शे. अकिल शे. मुसब, जब्या, अलीम वायरमन, फारूक, गफ्फार, सलाम खान गौस खान, शे. वजीर शे. चांद, नासीर खान सलाम खान, जावेद खान सलाम खान, शे. सत्तार शे. वजीर, शेख फिरोज शेख हुसेन, शे. बुढन शे. मस् तान, शे. याकुब शे. मसुद, अ. वहिद, अ. मंजुर, अफजल बेग हुसेन बेग, शे. बशिर शे. बिस्मील्ला, शे. अय्युब शे. मसुद, अ. सलीम अ. रज्जाक, शोएब खान फिरोज खान, शाहरूख खान फिरोज खान, मोहम्मद इद्रीस मो. जहीर, राजीक खान फिरोज खान, फिरोज खान करीम खान, नाजीम अहेमद अ. रहेमान अशा २७ जणांविरुद्ध कलम ३२४, ३५३, ३३३, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५0९, ३५४ (१) ब भादंवि तसेच १३५ बी.पी. अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. जियाउल्ला खान अमानउल्ला खान, युसूफ खान अनामत खान, शाहिद खान असर खान, शे. अकिल शे. मुसब, जब्या, अलीम वायरमन, फारूक, गफ्फार हे फरार झाले आहेत. अटकेत असलेल्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: 21 people arrested for rioting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.