२0१५ : स्पर्धा परीक्षांचे वर्ष
By Admin | Updated: December 8, 2014 23:36 IST2014-12-08T23:36:27+5:302014-12-08T23:36:27+5:30
युपीएससी, एमपीएससीच्या ४३ परिक्षांचे आयोजन

२0१५ : स्पर्धा परीक्षांचे वर्ष
ब्रह्मनंद जाधव/ मेहकर(बुलडाणा)
शिक्षणाचे मोठय़ा प्रमाणावर बाजारीकरण झाल्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांचे लोंढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. या सुशिक्षीत बेरोजगारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २0१५ या वर्षभरात तब्बल २१ स्पर्धा परीक्षा व संघ लोकसेवा आयोगातर्फे २२ स्पर्धा परीक्षांचे दालन खुले करण्यात आले आहे. सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी आगामी २0१५ हे वर्ष स्पर्धा परीक्षांचे वर्ष ठरत असून, बेरोजगारांना नोकरीच्या संधी यानिमित्त मिळणार आहेत.
शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. महागड्या शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी डीटीएड्, बीएड्, एमए, एमएसस्सीपर्यंत शिक्षण करुन बेरोजगारीच्या खाईत ढकलले जात आहेत. अलिकडच्या काळात अशा बेरोजगारांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढला आहे. २0१५ मध्ये शासनाने स्पर्धा परीक्षांचे दालन खुले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल २१ स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. संघ लोकसेवा आयोगातर्फेही २२ स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून, २0१५ मध्ये एकूण ४३ स्पर्धा परीक्षा होणार आहेत.
*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २१ परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन २0१५ मध्ये २१ स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत.