कन्यारत्न प्राप्त २00 महिलांचा सन्मान!
By Admin | Updated: August 3, 2015 01:37 IST2015-08-03T01:37:58+5:302015-08-03T01:37:58+5:30
मानतकर कुटुंबीयांचा असाही उपक्रम; मुलीच्या जन्माचे स्वागत.

कन्यारत्न प्राप्त २00 महिलांचा सन्मान!
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): मुलींचा जन्मदर झपाट्याने कमी होत असल्याने त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. याचे दुष्परिणाम आता शहरी भागातील नागरीकांनाच नव्हे, तर खेड्यातील लोकांनाही समजू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे हिवरा गडलिंग येथील मानतकर कुटुंबीयांमध्ये कन्यरत्न जन्माला आल्याने त्यांनी स्वागतप्रित्यर्थ गावातील कन्यारत्न जन्माला घालणार्या २00 मातांचे साडीचोळी देऊन स्वागत केले. प्रत्येक घरात जिजाऊ, सावित्री जन्माला यावी, असे प्रत्येकाला वाटते. विचार मंथनही होते. पण मुलीकडी पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. मात्र सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरागडलिंग येथे मुलीच्या जन्माचे आगळ्या वेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. २0१४ च्या मे महिन्यात या गावात डेंग्यु सदृष्य रोगाची लागण झाली होती. २0 ते २५ बालकांच्या पेशी कमी होवून त्यांना औरंगाबाद, जालना, बुलडाणा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातच तुळशिराम मानतकर यांची सात वर्षाची कन्या कु.पल्लवी हिलाही डेंग्युची लागण झाली. उपचारा दरम्यान ६ मे रोजी पल्लवीचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या घरी २४ जुलै रोजी पुन्हा शारदा व तुळशिराम मानतकर दाम्पत्यांनी कन्यारत्न झाले. कन्यारत्न जन्माला आल्याच्या आनंदात मानतकर कुटूंबियांनी एकत्रित येऊन एका कार्यक्रमाचे आयोजन करुन कन्यारत्नाला जन्म घालणार्या २00 मातांचा साडी चोळी देवून सन्मान केला.