२00 गावांना स्मशानभूमी नाही
By Admin | Updated: December 6, 2014 00:13 IST2014-12-06T00:13:07+5:302014-12-06T00:13:07+5:30
बुलडाणा जिल्ह्याची स्थिती : अंत्यसंस्कारासाठीही मिळत नाही जागा.

२00 गावांना स्मशानभूमी नाही
बुलडाणा : प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी असणे अपेक्षित आहे; मात्र अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी महसूल विभागाकडे जागाच उपलब्ध नाही, त्यामुळे गावाबाहेर कुठे तरी अंत्यसंस्कार केल्या जातो, तर अनेक ठिकाणी खासगी जागेवर अंत्यसंस्कार उरकल्या जाता त. किनगाव जट्ट येथे ३ डिसेंबर रोजी स्मशानभूमीच्या जागेवरून वाद उफाळला. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील स्मशानभूमीची दशा आणि दिशा याबाबत आढावा घेतला असता तब्बल २00 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे.
लोकवस्ती असलेल्या प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी विशिष्ट अशी जागा नियोजित केली जाते त्यासाठी गावठाण किंवा महसूल जमिनीचा विचार केला जातो. याठिकाणी जिल्हा परिषद तसेच आमदार निधीतून स्मशानभूमी उभारण्याचे काम केले जाते. बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४३३ गावे असून, बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी स्मशानभूमीचे शेडही उभारले आहे; मात्र तरीही २00 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उ पलब्ध नाही. यामध्ये सर्वाधिक ४५ गावे ही संग्रामपूर तालुक्यातील आहेत.
ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही अशा गावांना खासगी मालकीच्या जागेवर अं त्यसंस्कार केले जातात व त्यातून अनेकदा वादही उपस्थित झाले आहेत.