शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

२0 साठवण बंधारे होणार

By admin | Updated: September 3, 2014 23:31 IST

विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत खामगाव उपविभागात तलाव दुरूस्तीची सुमारे २ कोटींची कामे.

खामगाव : विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २0१३-१४ या वर्षात खामगाव उपविभागात कोल्हापुरी बंधारे, पाझर व सिंचन तलाव दुरूस्तीची सुमारे २ कोटींची कामे झाली आहेत. तर २0१४-१५ या वर्षात उपविभागातील शेगाव, खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यात सिंचनासाठी नवीन २0 साठवण बंधारे होणार आहेत. बंधारे निर्मीतीमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने सन २0१२-१३ ते २0१६-१७ या पाच वर्षाच्या कार्यकाळात विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विदर्भातील पावसाचे कमी प्रमाण, अनिश्‍चितता व अनियमीतता विचारात घेऊन संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ, पावसाच्या पाण्याचे लघू सिंचन योजनाव्दारे जलसंचय करणे तसेच प्रभावी सिंचन उपाययोजना व उत्तम पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविणे या शेतकर्‍यांचे सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू आहे. शेतकर्‍यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढून ती उन्हाळ्याच्या दिवसात कायम राहावी याकरीता कोल्हापुरी बंधारे, सिंचन, गाव तसेच पाझर तलाव निर्मितीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न चालू आहेत.खामगाव उपविभागात सन २0१४-१५ या वर्षात २0 बंधार्‍याला मंजुरात मिळाली असून खामगाव तालुक्यात ७ साठवण बंधारे, शेगाव तालुका ३, जळगाव जामोद ५ व संग्रामपूर तालुक्यात ५ असे २0 साठवण बंधारे होणार आहेत. गतवर्षी बंधारे व तलाव दुरूस्तीसाठी जवळपास २ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. उपविभागातील गणेशपूर, लोखंडा, गारडगाव, कारेगाव, गव्हाण, अंत्रज, पिंप्राळा, शहापूर, वरखेड, भिलखेड व बावनबीर येथील कामे प्रगतीपथावर आहेत. सुटाळा येथील बोर्डी नदीवरचा अनिकट व सुजातपूर येथील कोल्हापुरी बंधार्‍याचे काम महात्मा फुले जलसंधारण अभियानाअंतर्गत पूर्ण केले आहे.सन २0१४-१५ मध्ये खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी, संभापूर, चिंचखेड बंड, शिर्ला, हिंगणा कारेगाव, शेलोडी, पारखेड, पिंप्री कोरडे, हिवरा बु., व अटाळी तर शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस, लासुरा, तिंत्रव, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, इस्लामपूर येथील जुन्या बंधारे व तलावाच्या दुरूस्तीस मंजुरात मिळाली आहे. या तलावाच्या दुरूस्तीमुळे ४00 ते ४५0 हेक्टर शेतीला लाभ मिळू शकतो. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.* उन्हाळ्यातही जलपातळी कायमशेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बंधारे निर्मितीचा कार्यक्रम सुरू आहे. बंधार्‍यात साचलेल्या पाण्यामुळे विहिरीची जलपातळी वाढून उन्हाळ्याच्या दिवसात शेतकर्‍यांना सिंचन करता आले आहे. खामगाव तालुक्यातील गणेशपूर व लोखंडा येथे गतवर्षी डोह खोलीकरण केल्याने या भागात पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. उपविभागात बहूतांश ठिकाणी आतापर्यंत शासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या तलावाचा शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.*१७ बंधार्‍याची दुरूस्ती होणार खामगाव उपविभागात ४४ कोल्हापुरी बंधारे, ११ सिंचन तलाव, ५४ पाझर तलाव व २२ गाव तलाव आहेत. विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत या बंधारे व तलावाची आवश्यकतेनुसार दुरूस्तीचे कामे सुरू आहे. सन २0१४-१५ वर्षात खामगाव तालुक्यात ११, शेगाव तालुक्यात ३, जळगाव जामोद तालुक्यातील ३ अशी एकुण १७ बंधार्‍याची दुरूस्ती होणार आहे.बंधारे व पाझर तलावाची गतवर्षातील ८0 टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. उर्वरीत कामे पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार. नवीन बंधारे व जुन्या बंधार्‍याची दुरूस्ती याचा शेतकर्‍यांना फायदा होईल.- पी.यु. सरदार, उपविभागीय अधिकारी, सिंचन उपविभाग जि.प. खामगाव.