पाणीपुरवठा योजनेवर २0 कोटींची तरतूद

By Admin | Updated: February 27, 2015 01:14 IST2015-02-27T01:14:49+5:302015-02-27T01:14:49+5:30

लोणार पालिकेचा अर्थसंकल्प मंजूर; अग्निशमन इमारत होणार.

20 crores for water supply scheme | पाणीपुरवठा योजनेवर २0 कोटींची तरतूद

पाणीपुरवठा योजनेवर २0 कोटींची तरतूद

लोणार (बुलडाणा): स्थानिक नगर पालिकेने २५ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेमध्ये लोणार नगर पालिकेचा सन २0१४-१५ चा सुधारित व २0१५-१६ चा अंदाजीत अर्थसंकल्प मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सादर केला. नगर परिषद लोणार ह्यकह्ण वर्ग असलेल्या लोणार न.प.तील सर्वसाधारण सभेमध्ये प्रारंभीक शिलकेसह महसुली व भांडवली जमा ७८ कोटी ३६ लाख ७७ हजार ६८0 व महसुली आणि भांडवली खर्च ७८ कोटी १६ लाख ६0 हजार असा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये प्रगतीपथावरील भांडवली कामे, नगर परिषद पाणीपुरवठा योजनेवर २0 कोटी, एकात्मीक गृहनिर्माण योजना टप्पा १ व २ वर १६ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. विकासात्मक कामामध्ये महासुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरीता १५ कोटी रुपये, अग्नीशमन इमारतीकरीता ८५ लक्ष, नगर परिषदेचे नविन इमारतीकरीता ३ कोटी रुपये, तसेच महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून मिळणार्‍या १३ वा वित्त आयोग, १४ वा वित्त आयोग, वैशिष्टयपूर्ण योजना दलीतवस्ती योजना, रस्ता निधी, युडी.६ अंतर्गत निधी, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ निधी व इतर वेगवेगळ्या योजनेअंतर्गत मिळणार्‍या निधीतील विकासात्मक कामांचा समावेश असलेला अर्थसंकल्प मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षा सौ.रंजना राजेश मापारी यांचेकडे सर्वसाधारण सभेची मंजूरात घेणेसाठी सादर केला. सभेने सर्वानुमते मंजूरी प्रदान केली.

Web Title: 20 crores for water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.