काम न करताही अदा केले २ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:37 IST2017-08-09T00:36:27+5:302017-08-09T00:37:33+5:30
मेहकर : तालुक्यातील कळपविहिर येथे झालेल्या महाजलच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ठेकेदाराने काम न करता २ लाख ३४ हजार रुपये शिल्लक काढून निकृष्ट काम केले आहे. त्यामुळे ठेकेदार व समितीवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी विहिरीतील पाण्यात बसून उपोषण करण्याचा इशारा अशोक जगन्नाथ तांगडे यांनी दिला आहे.

काम न करताही अदा केले २ लाख रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : तालुक्यातील कळपविहिर येथे झालेल्या महाजलच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ठेकेदाराने काम न करता २ लाख ३४ हजार रुपये शिल्लक काढून निकृष्ट काम केले आहे. त्यामुळे ठेकेदार व समितीवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी विहिरीतील पाण्यात बसून उपोषण करण्याचा इशारा अशोक जगन्नाथ तांगडे यांनी दिला आहे.
मेहकर तालुक्यातील कळपविहिर येथील पाणी प्रश्न मिटावा, यासाठी सन २0१४ मध्ये महाजल योजना मंजूर करण्यात आली होती. सदर योजना जवळपास ४९ लाखाचेवर होती. गावामध्ये सदर योजनेचे काम करीत असताना संबंधीत अधिकारी, ठेकेदार व समिती यांनी संगणमत करुन निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप अशोक तांगडे यांनी तक्रारीमध्ये केलेला आहे. लाखो रुपये खचरुनही या योजनेचे पाणी गावामध्ये आलेच नाही. पाईपलाईन अर्धवट आहे. जे काही थोडेफार पाईप टाकले आहेत ते पाईपही निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. विहिरीवर जाळी नाही, इथरवाल, स्वीच रुम, विहिरीची खोली आदी कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे सदर प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच दोषींवर कारवाई करावी, यासाठी मेहकर येथील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय अधिकारी यांना वेळोवेळी तक्रारी तथा अनेक वेळा निवेदन दिले आहे. परंतु संबंधीत अधिकारी हे ठेकेदार व समितीला पाठीशी घालत आहेत.
त्यामुळे १४ ऑगस्ट पर्यंत चौकशी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाच्या दिवशी कळपविहिर येथील विहिरीतील पाण्यात बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक जगन्नाथ तांगडे यांनी दिला आहे.
कळपविहिर येथे महाजल योजना मंजूर झाली असून, सदर योजना ४९ लाख ९0 हजारांची आहे. सदर योजनेचे २ हप्ते मिळाले असून, १ हप्ता बाकी असल्याने उर्वरीत काम अर्धवट आहे. सदर हप्ता भेटल्यानंतर काम पूर्ण करण्यात येईल.
- विजय खिल्लारे, ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग,मेहकर.