आग लागून २ बक-या, ४0 कोंबड्या ठार

By Admin | Updated: May 15, 2015 23:44 IST2015-05-15T23:38:19+5:302015-05-15T23:44:11+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील आडगावराजा येथील घराला आग.

2 fire-borne, 40 poultry dead in fire | आग लागून २ बक-या, ४0 कोंबड्या ठार

आग लागून २ बक-या, ४0 कोंबड्या ठार

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील आडगावराजा येथील साहेबराव भागाजी कहाळे यांच्या घराला अचानक आग लागून २ बकर्‍या व चाळीस कोंबड्यांसह धान्य, कपडे, पैसे जळून खाक झाले. ही घटना १५ मे रोजी सकाळी घडली. या आगीमध्ये साहेबराव कहाळे यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी वाय.एच. घरजाळे यांनी तयार केला आहे. १५ मे रोजी सकाळी ९.३0 वाजता साहेबराव कहाळे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत १ बकरी जळून मृत्युमुखी पडली तर १ बकरी ४0 टक्के भाजली आहे. यामुळे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच ४0 कोंबड्या जळून १0 हजार रुपयांचे नुकसान झाले. घरातील धान्य, कपडे, भांडी, टिनपत्रे व कागदपत्रे आदी ३३ हजार रुपयांचे साहित्य तसेच रोख ४५ हजार या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत.

Web Title: 2 fire-borne, 40 poultry dead in fire