बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १९६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:34 AM2020-09-09T11:34:32+5:302020-09-09T11:34:42+5:30

जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या ४,१९१ झाली असून मंगळवारी एकाचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतकांची संख्या ५९ झाली आहे.

196 positive on the same day in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १९६ पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १९६ पॉझिटिव्ह

Next

बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून मंगळवारी तब्बल १९६ जण बाधीत निघाले. आजपर्यंतचा बुलडाणा जिल्ह्यातील एक विक्रमच म्हणावा लागेल. दरम्यान, जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या ४,१९१ झाली असून मंगळवारी एकाचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतकांची संख्या ५९ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीडपटीने वाढविण्यात आला असून बाधीतांची संख्याही त्या तुलनेत  वाढत आहे. प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपीड टेस्ट असे मिळून ७०८ संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५१२ जणांचा ्हवाल निगेटीव्ह आला तर १९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात १५६ अहवाल प्रयोगशाळेतून तर रॅपीड टेस्टमध्ये ४० जण पा२झिटिव्ह आले.
यामध्ये खामगावमध्ये ३१, शिर्ला नेमाने व शेलोडी येथे प्रत्येकी एक, देऊळगाव राजा  १४, निमगांव गुरू  १६, देऊळगाव मही, पाच, मेंडगाव एक, बुलडाणा १४, कोलवड एक,  चिखली दोन, देऊळगाव घुबे एक, मेरा बुद्रूक एक, किन्होळा वाडी दोन, मलकापूर १३, शिराढोण एक, विवरा सहा, मोरखेड एक, मेहकर सहा, डोणगाव एक, बोरी दोन, जानेफळ चार, बोराखेडी एक, धामणगाव बढे एक, इब्राहीमपूर एक, मोताळा दोन, बिबी दोन, शिवणी पिसा १४, नांदुरा पाच, वडनेर भोलजी दोन, नांदुरा दोन, जळगाव जामोद चार, वडशिंगी सात, खेर्डा चार, जामोद एक, वाडी खुर्द एक, आगेफळ एक, मोहाडी सवडत पाच, दरेगांव एक, झोटींगा एक,  साखरखेर्डा एक, सिंदखेड राजा पाच, शेगाव दहा, संग्रामपूर एक या प्रमाणे कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान, धाड येथील एका ६५ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे आठ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतकांची संख्या ५९ झाली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील २० हजार ९४१ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, ३,००८ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप १,३३७ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात बाधीतांची संख्या ४,१९१ झाली आहे पैकी १,१२४ जणांवर सध्या उपचार करण्यात येत आहे. ५९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

१२५ रुग्णांची कोरोनावर मात
एकीकडे १९६ कोराना बाधीत आढळून आले असतानाच १२५ जणांनी कोरोनावर मात केल्याचा दिलासाही जिल्ह्याला मिळाला आहे. यामध्ये देऊळगाव राजा चार,  धोत्रा नंदई एक, शेगाव दोन, भोनगाव एक, माटरगाव एक, नांदुरा नऊ, निमगाव तीन, माळेगाव गोंड एक, मलकापूर चार खामगाव २५, चिखली चार,  शेलगाव ज. एक, सोयंदेव एक, उमरद दोन, किनगाव राजा दोन, वाघाळा दोन, साखरखेर्डा एक, सिंदखेड राजा तीन, मेहकर तीन,  डोणगाव १३, खेडी दोन, बुलडाणा १४, सव एक, सावळा एक, कासारखेड एक, लोणार १३, जळगाव जामोद चार, पिंपळगाव काळे पाच, खेर्डा खुर्द एक, सोनाळा एक या प्रमाणे बाधीतांनी कोरोनावर मात केली. दरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात येत असलेल्या वडाळा येथील एकाचाही यात समावेश आहे.

Web Title: 196 positive on the same day in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.