१९ हजारांची गावठी दारू जप्त
By Admin | Updated: November 13, 2014 00:27 IST2014-11-13T00:27:57+5:302014-11-13T00:27:57+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचा बोरखेड व वरवंड येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा.

१९ हजारांची गावठी दारू जप्त
बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बोरखेड व वरवंड येथील गावठी दारू अड्ड्यावर छापे टाकून २९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व चार आरोपींना रंगेहात पकडले. वरवंड व बोरखेड शिवारात गावठी दारूच्या हातभट्टय़ा सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. याआधारे विभागाचे अधीक्षक डी.जी.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील प्रभारी निरीक्षक मावळे, दुय्यम निरीक्षक लोखंडे, व्ही.एम. पाटील, शिपाई देशमुख, जाधव, तिडके, मोरे, सोळंकी यांनी वरवंड शिवारातील मळी येथे छापा टाकून विष्णू पवार, वंदना पवार, वसंता पवार, सुनिता पवार यांना रंगेहात पकडले; तसेच त्यांच्या जवळून तीन हजार रूपयांची ५८ लिटर गावठी दारू आणि दारू गाळण्याचे सहित्य, मोह फुल, रसायन असा माल जप्त केला. आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले.