शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात महावितरणच्या कारवाईत १९ लाखांच्या वीज चोऱ्या उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:14 IST

 बुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने गुरूवारी अर्थात दहा मे रोजी जिल्ह् यात ४७ पथकाद्वारे धडक कारवाई करून १९ लाख २८ हजार रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये बुलडाणा , मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे एकूण २३० जणांवर कारवाई करण्यात आली. आकस्मिकपणे ...

ठळक मुद्देबुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे एकूण २३० जणांवर कारवाई करण्यात आली.सर्वांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली. अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी केले आहे. 

 

बुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने गुरूवारी अर्थात दहा मे रोजी जिल्ह् यात ४७ पथकाद्वारे धडक कारवाई करून १९ लाख २८ हजार रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे एकूण २३० जणांवर कारवाई करण्यात आली. आकस्मिकपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वीज चोरट्यांचे धाबे दणांणले आहे. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणने गेल्या काही काळात पायाभूत सुविधांवर भर देत दर्जा सुधारला आहे. त्यामुळे वीज चोरी व वीजेचा अवैध वापर करणार्यांचीही माहिती समोर आली आहे. त्यानुषंगाने ही धडक कारवाई करण्यात आली. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता जी. एम. कडाळे यांच्या नेतृत्वाखाली एकूण ४८ पथकांद्वारे कार्यकारी अभियंते काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये व पांडुरंग पवार यांच्यासह जिल्ह्यातील अभियंते, अधिकारी व जनमित्र यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. या पथकांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विविध वर्गवारीच्या ग्राहकांची तपासणी केली. त्या दरम्यान हे सर्व प्रकार उघड झाले.

खामगाव विभागात सर्वाधिक चोऱ्या

या कारवाईदरम्यान विद्युत वाहिन्यावर आकोडे, हुक टाकून तथा वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. सोबतच वीजेचा गैरवापरही काही ग्राहक करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये बुलडाणा विभागात ५१ ग्राहकांनी दोन लाख ५१ हजार तर खामगाव  विभागातील १२५ ग्राहकांनी १४ लाख ६२ हजार आणि मलकापूर विभागातील ५४ ग्राहकांनी २ लाख १६ हजार रुपयाची वीज चोरी केल्याचे कारवाई दरम्यान स्पष्ट झाले. या सर्वांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामूहिकरीत्या सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी केले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण