आचारसंहिता कालावधीत १८.५७ लाखांचा एवज जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : १६७ गुन्ह्यांची नोंद

By संदीप वानखेडे | Published: April 15, 2024 07:20 PM2024-04-15T19:20:20+5:302024-04-15T19:20:48+5:30

या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ६७२.६८ लीटर, विदेशी मद्य ८८.२ लीटर, ताडी १४८ लीटर, रसायन सडवा २ लाख ४८ हजार ५७० लीटर, हातभट्टी १ हजार ५९४ लीटर पकडण्यात आली आहे.

18.57 lakh seized during Code of Conduct period, State Excise Action: 167 cases registered | आचारसंहिता कालावधीत १८.५७ लाखांचा एवज जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : १६७ गुन्ह्यांची नोंद

आचारसंहिता कालावधीत १८.५७ लाखांचा एवज जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : १६७ गुन्ह्यांची नोंद

बुलढाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १६७ गुन्हे नोंदविले आहेत. १६४ वारस गुन्ह्यात १७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ९ वाहनासह एकूण १८ लाख ५७ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ६७२.६८ लीटर, विदेशी मद्य ८८.२ लीटर, ताडी १४८ लीटर, रसायन सडवा २ लाख ४८ हजार ५७० लीटर, हातभट्टी १ हजार ५९४ लीटर पकडण्यात आली आहे.

जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवर निमखेडी आणि हनवतखेड येथे सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनगाव शिवार, ता. जळगाव जामोद येथे राज्य उत्पादन शुल्कच्या खामगाव पथकाने २६ मार्च २०२४ रोजी दारूबंदी अधिनियमांतर्गत छापा टाकला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या छाप्यामध्ये १३० लीटर हातभट्टी, मोहासडवा १ हजार २०० लीटर, प्लास्टिक नळ्या ६ नग, पंधरा लीटर क्षमतेचे पतरी डबे ८६ नग, जर्मन घरव्या ६ नग, २० लीटर क्षमतेचे जार ५ नग, १० लीटर क्षमतेचे ३ कॅन असा ५९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये आरोपी राजू नथ्थू बोबडे आणि प्रशांत रत्नाकर राऊत, दोघे रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद यांना अटक करण्यात आली. 

तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या बुलडाणा पथकाने दि. १० एप्रिल २०२४ रोजी गोतमारा शिवारातील कुऱ्हा फाटा, ता. मोताळा येथे हातभट्टी दारू ६० लीटर २ वाहनासह पकडण्यात आली. त्यात एकूण ८१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी अनिल शिवाजी गवळी आणि सुनील मोहनसिंग बिडवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: 18.57 lakh seized during Code of Conduct period, State Excise Action: 167 cases registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.