१८ तास अभ्यास उपक्रम
By Admin | Updated: April 10, 2017 00:08 IST2017-04-10T00:08:14+5:302017-04-10T00:08:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती बुलडाणा व कर्मचारी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिजामाता महाविद्यालयात १८ तास अभ्यास उपक्रम ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला.

१८ तास अभ्यास उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे आयोजन
बुलडाणा : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर नव्हे, तर डोक्यात घ्यावे, त्यांचे विचार व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती बुलडाणा व कर्मचारी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिजामाता महाविद्यालयात १८ तास अभ्यास उपक्रम ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला. या उपक्रमात जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १८-१८ तास अभ्यास करून संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाही प्रदान केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून, हे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे. त्यांनी केलेले कार्य समाजातील सर्वच घटकांना प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या बुलडाणाच्या माध्यमातून १८ तास अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक इंगळे, मुख्याध्यापक सुभाष विनकर, कुणाल पैठणकर, खंडागळे, अॅड. वानखेडे, अॅड.गणेश इंगळे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी प्रा. जयकुमार गवई, प्रा.डॉ. गौतम अंभोरे, लक्ष्मण साळवे, प्रा.राहुल इंगळे, प्रा.गजानन वानखेडे, मोतीराम इंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.मेश्राम, तर आभार प्रा.खंडेराव यांनी मानले. या उपक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता करण्यात आली, तर रात्री ११ वाजता राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.