शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघातात १७ जण जखमी, गृहरक्षकांची बस दुभाजकावर आदळली

By विवेक चांदुरकर | Updated: May 22, 2024 12:22 IST

पाच गंभीर जखमी

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर: राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री व पहाटे घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात १७ जण जखमी झाले. त्यापैकी पाच गंभीर जखमींना बुलढाणा व अकोला रेफर करण्यात आले आहे. १२ जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.पालघर येथील लोकसभा निवडणूक आटोपल्यावर एम.एच.१४ बी.पी.३८८२ क्रमांकाची बस गृहरक्षकांना घेवून अकोला जात होती. मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास भरघाव बसने राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ओव्हरब्रिज वरील दुभाजकाला धडक दिली.

या अपघातात बस चालकासह १४ जण जखमी झाले. त्यापैकी गोपाल जाधव (वय २८) रा.जवळा बु.व संतोष दामोदर गणोजे (वय ४२) रा.कोळंबी मुर्तीजापूर या दोघांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले. उर्वरित १२ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिसांनी बसचालक दीपक भाऊराव मडावी (वय ४९) रा.यवतमाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच राष्ट्रीय महामार्गावरील दख्खन अॉटो सर्व्हिस सेंटर जवळ पहाटे ४ वाजताच्या सुमारास जी.जे.१८/ बी.टी.८५३८ क्रमांकाचा ट्रक व एन.एल.०१ /ए.एफ.६७०१ क्रमांकाच्या कंटेरनची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनातील मोहम्मद इकरार मोहम्मद जुबेर (वय ३८) रा.अहमदाबाद, मोहम्मद सादीक मोहम्मद नफीस (वय ४२) इलाहाबाद व अजय अमरसिंह वासकले (वय २१) रा.सेंदवा मध्यप्रदेश असे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना बुलढाणा रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

महामार्गाचे अपूर्ण कामामुळे घडतात अपघात

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र अजूनही रेल्वे ओव्हरब्रिज निर्माणाधीनच आहे. त्यामुळे सुरू असलेल्या एकतर्फी वाहतूकीत ट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. महामार्ग प्राधिकरण या विषयावर गांभीर्याने कारवाई करत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातMalkapurमलकापूर