शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

अडीच लाख भाविकांची महापंगत, १५१ क्विंटल पुरीभाजीसह महाप्रसादाचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 19:41 IST

५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान सुमारे अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. यावेळी १५१ क्विंटल पुरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद वितरती करण्यात आला.

हिवरा आश्रम -  ५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान सुमारे अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. यावेळी १५१ क्विंटल पुरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद वितरती करण्यात आला. राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांच्या ‘स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, शुकदास महाराज की जय’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. श्रीश्रीश्री महामंडलेश्वर बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते तर खासदार प्रतापराव जाधव,आ. डॉ. संजय कुटे, आ. डॉ. संजय रायमूलकर, आ. बळीराम सिरस्कर, महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले पाटील, जि. प. सदस्य संजय वडतकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थित महाप्रसाद वितरणास सुरुवात झाली होती. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, राष्ट्रवादी काँगे्रस मेहकर विधानसभा अध्यक्ष पुरूषोत्तम पाटील, भाजपच्या जेष्ठ नेत्या मंदाकिनी कंकाळ, रा. काँ. चे मेहकरचे तालुका अध्यक्ष गजानन सावंत, दत्ताभाऊ खरात, सामूहिक विवाहाचे प्रणेते शिवाजीराव नवघरे, राष्ट्रवादी किसान सेना जिल्हाध्यक्ष संपतराव देशमुख, सिंदखेड राजा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष  शिवदास रिंढे, जिजाऊ क्रांती सेनेचे संस्थापक अंबादास गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वºहाडे, उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, अ‍ॅड. साहेबराव सरदार, चिखलीचे नगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, भिमशक्तीचे नेते भाई कैलास सुखदाने, माजी जि. प. सदस्य मनिष शेळके, अरविंदराव वानखेडे, अ‍ॅड. विनोद नरवाडे, पं. स. सदस्या वर्षाताई मवाळ, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनकर कंकाळ, माजी जि. प. सदस्य विष्णु मगर, अ‍ॅड. किशोर धोंडगे, नंदाराम काळे, अ‍ॅड सतिष रोठे, एकनाथराव दुधे, माजी सभापती बबनराव लहाने, अमोल म्हस्के, सुरेशतात्या वाळूकर, प्रमोद रायमूलकर, मनोहर गि-हे, प्रा. प्रशांत पडघान, विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत, विवेक घळसासी, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जवंजाळ, मधुकर गवई, अ‍ॅड. किशोर धोंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी संचलन केले. त्यांनी शंखध्वनीसह स्वामी विवेकानंद व शुकदास महाराज यांच्या नावाचा जयघोष केला. विवेकानंद आश्रमाचे प्रसारमाध्यम सल्लागार पुरुषोत्तम सांगळे, विश्वस्त अ‍ॅड. किशोर धोंडगे, पुरुषोत्तम अकोटकर, प्रा. कैलास भिसडे, नारायण भारस्कर, अशोक गिºहे, शशिकांतअप्पा बेंदाडे, पंढरीनाथ शेळके, संजय भारती, शिवदास सांबपूरे, वसंतआप्पा सांबपूरे, विजय भोरे, यांच्यासह आश्रमाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी यांनी सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक राणे व त्यांच्या सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  १०१ ट्रॅक्टरद्वारे महाप्रसाद वितरणया महापंगतीमध्ये सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवित ५० एकराच्या परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या होत्या. १०१ ट्रॅक्टरद्वारे व चार हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुंकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले.  विद्यार्थ्यांचा पुढाकारराज्यातील एकमेव ठिकाणी एवढ्या भव्य महाप्रसाद वितरीत करण्याकरीता विवेकानंद कृषी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, ज्युनियर कॉलेजच्या मुलीनी महीलांच्या पंगतीला महाप्रसाद वितरीत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्र