तत्कालीन दुय्यम निबंधकासह १५ जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 15, 2014 00:17 IST2014-05-15T00:17:24+5:302014-05-15T00:17:50+5:30

बनावट कागदपत्रे तयार करुन शेतीची खरेदी केल्याप्रकरणी तत्कालीन दुय्यम निबंधकासह १५ जणांवर गुन्हा दाखल

15 people including the then Sub-Registrar | तत्कालीन दुय्यम निबंधकासह १५ जणांवर गुन्हा दाखल

तत्कालीन दुय्यम निबंधकासह १५ जणांवर गुन्हा दाखल

खामगाव : बनावट कागदपत्रे तयार करुन तसेच खोटे मालक उभे करुन शेतीची खरेदी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तत्कालीन दुय्यम निबंधकासह १५ जणांवर न्यायालयाचे आदेशावरुन काल १३ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. तर आधीही असे अनेक प्रकार घडले असून याप्रकरणी पो.स्टे.ला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्थावर मालमत्तेच्या बनावट खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे या प्रकरणांवरुन दिसून येत आहे. साहेबराव ठमाजी खरात वय ६0 यांना २८ फेब्रुवारी २0१४ पूर्वी आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालय खामगाव येथे वर्णा शिवारातील गट नं. १७३ मधील जमीन २ हेक्टर २३ आर.पैकी ६२ आर. जमीनीची संगनमत करुन शेतीचे बनावट कागदपत्रे तयार करुन खोटे मालक उभे करुन स्वत:च्या फायद्याकरिता बनावट खरेदी तयार करुन दिली होती. यामुळे साहेबराव खरात यांची १ लाख ६0 हजारांनी फसवणूक झाली होती. याबाबत उपरोक्त आशयाची फिर्याद देवून साहेबराव खरात यांनी न्यायालयाकडे दाद मागितली होती. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश शहर पोलिसांनी दिले. त्यामुळे शहर पोलिसांनी काल १३ मे रोजी तत्कालीन दुय्यम निबंधक खामगाव यांचेसह १५ जणांविरुध्द कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शिंगनवाड करीत आहेत.

Web Title: 15 people including the then Sub-Registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.