१४ व्या वित्त अंतर्गत निकृष्ट कामे!

By Admin | Updated: April 7, 2017 15:11 IST2017-04-07T15:11:59+5:302017-04-07T15:11:59+5:30

बोराखेडी ग्रामपंचायतीने १४व्या वित्त अंतर्गत अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप लाईनचे काम केले आहे.

14th Finances Under Finances! | १४ व्या वित्त अंतर्गत निकृष्ट कामे!

१४ व्या वित्त अंतर्गत निकृष्ट कामे!

मोताळा : बोराखेडी ग्रामपंचायतअंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात
आलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई अशी मागणी
बोराखेडी ग्रा. पं. चे उपसरपंच शे. साबीर शे. बशीर यांनी गट विकास
अधिकाऱ्याकडे केली आहे.
      बोराखेडी येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये बोराखेडी ग्रामपंचायतीने १४
व्या वित्त अंतर्गत अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप लाईनचे काम केले आहे.
सदर काम कोणत्याही ग्रा. पं. सदस्यांना विश्वासात न घेता करण्यात आले
असून  टेंडर न काढता केले आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पाईप लाईन
बऱ्याच ठिकाणी फुटली असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. फुटलेल्या पाईप
लाईनमधून ग्रामस्थांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे
आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित
कामाची चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य कमिटीला कोणतेही बिल अदा करून नये.
बोराखेडी सरपंच यांनी सदर कामात जुनी पाईप लाईन टाकून नवीन दाखवत बिल
काढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई
करावी असे तक्रारीच्या शेवटी नमूद आहे. तक्रारीवर  शे. साबीर शे. बशीर
उपसरपंच बोराखेडी यांची स्वाक्षरी असून, तक्रारीच्या प्रतिलिपी
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा यांना देण्यात आल्या
आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 14th Finances Under Finances!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.