शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील १४० टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:39 IST

बुलडाणा : दमदार पावसामुळे जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दमदार पावसामुळे जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट झाली आहे. १२२ गावांची टँकरवरील पिण्याच्या पाण्याची भीस्त समाप्त झाली असून जिल्ह्यातील १४० टँकर बंद करण्यात आले आहेत.उन्हाळ्यात जिल्हा वासियांनी भिषण पाणीटंचाईला तोंड दिले. या भिषण पाणीटंचाईच्या काळात शासन व प्रशासन जिल्हावासियांना कुठल्याही परिस्थितीत पाणी देण्यासाठी प्रयत्नरत होते. त्यामधून पाणी टंचाई कृती आराखड्यातील गावांमध्ये विविध उपाययोजना सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संवादही साधला. त्यामुळे टंचाईच्या काळातील संबंधीतांच्या गावांतील समस्या सोडविण्यास मदत झाली. जिल्हाभर गत काही दिवसांमध्ये गाळ काढणे, नाला रूंदीकरण व खोलीकरण, नदीतील डोहांचे खोलीकरण, जलाशयांना गाळ मुक्त करण्याचे काम जलसंधारण, कृषि, सिंचन व भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून झाले. त्यासोबतच सिमेंट नाला बांध, साखळी बांध, माती नाला बांध, समतल चर, गॅबीयन बंधारे, पाझर तलाव दुरूस्ती, संग्राहक तलाव आदी कामे करण्यात आली. या प्रभावी कामांमुळे पडलेल्या दमदार पावसाचे पाणी जमिनीत मुरले. परिणामी, अनेक गावांमधील कोरडे पडलेले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत जलयुक्त झाले. जलसंधारणाची कामे व दमदार पावसामुळे ३०० गावांमध्ये ३२४ पर्यंत पोहोचलेला टँकरचा आकडा खाली येण्यास सुरूवात झाली.सद्यस्थितीत भूजल पातळी सुधारल्यामुळे, कोरडे पडलेले जलाशय पाण्याने भरल्यामुळे १२२ गावांची टँकरवरील भिस्त समाप्त झाली आहे. तब्बल १४० टँकर बंद करण्यात आले आहेत. कृती आराखड्यानुसार टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावित उपाययोजना २५९ गावांमध्ये होत्या. मात्र मागणीनुसार ३०० गावांमध्ये ३२४ टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले व या गावांना पाणी पुरवठा करण्यात आला.सद्यस्थितीत अजूनही १८४ गावांमध्ये १८४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहील्यास या गावांमधील टँकरही बंद होतील. तालुकानिहाय गावांना मंजूर टँकर, बंद करण्यात आलेली टँकरची संख्याबुलडाणा तालुक्यात ३६ गावांमध्ये ४९ टँकर मंजूर करण्यात आले होते. सध्या २९ गावांतील ४० टँकर बंद करण्यात आलेले आहेत. चिखली तालुक्यात ३० गावांमध्ये ३० टँकर मंजूर होते. त्यापैकी १२ गावातील १३ टँकर बंद करण्यात आले. देऊळगाव राजा तालुक्यात २९ गावामध्ये ३१ टँकर मंजूर होते, त्यातील दोन गावातील तीन टँकर बंद झाले. मेहकर तालुक्यात २७ गावांमध्ये ३० टँकर मंजूर, सध्या नऊ गावांतील नऊ टँकर बंद झाले. लोणार तालुक्यात १० गावांमध्ये १३ टँकर मंजूर होते. सध्या सात गावांतील १० टँकर बंद झाले. सिंदखेड राजा तालुक्यात ३१ गावांमध्ये ३३ टँकर मंजूर होते. त्यापैकी सध्या सात गावांतील नऊ टँकर बंद झाले. खामगांव तालुक्यात ४६ गावांमध्ये ४५ टँकर मंजूर होते. तर सध्या ३२ गावांतील ३२ टँकर बंद झाले. शेगांव २४ गावांमध्ये २७ टँकर मंजूर होते. सध्या ८ गावांतील ८ टँकर बंद झाले. संग्रामपूर २ गावांमध्ये १ टँकर मंजूर, मलकापूर तालुक्यात ८ गावांमध्ये आठ टँकर मंजूर होते. सध्या पाच गावांतील पाच टँकर बंद करण्यात आले. मोताळा तालुक्यात २६ गावांमध्ये २७ टँकर मंजूर होते. त्यातील तीन गावांतील तीन टँकर बंद झाले. नांदुरा तालुक्यात ३१ गावांमध्ये ३० टँकर मंजूर करण्यात आले होती. त्यापैकी ८ गावांतील ८ टँकर बंद करण्यात आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसwater scarcityपाणी टंचाई