अपघातात १४ पर्यटक गंभीर जखमी
By Admin | Updated: October 27, 2014 23:29 IST2014-10-27T23:29:10+5:302014-10-27T23:29:10+5:30
मेहकर-लोणार मार्गावरील स्कार्पिओ गाडीच्या अपघातात यवतमाळ येथील एकाच कु टुंबातील १४ जण जखमी.

अपघातात १४ पर्यटक गंभीर जखमी
लोणार (बुलडाणा) : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी निघालेल्या यवतमाळ येथील कासिटवार परिवाराच्या स्कार्पिओ गाडीला मेहकर-लोणार रोडवरील शारा फाट्यानजीकच्या वळणावर अपघात झाल्याने कु टुंबातील १४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली.
यवतमाळ येथील कासिटवार परिवार एम.एच.३१ डी.व्ही.९८७३ क्रमांकाच्या स्का िर्पओ गाडीने मेहकरवरुन लोणारकडे येत असताना शारा फाट्यावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची गाडी झाडावर जावून धडकली. यामध्ये गाडीतील प्रशांत मुकूंद कासिटवार (२0), शिवम विनोद कासिटवार (१२), विनोद सुभाष कासिटवार (४0), मुकुंद सुभाष कासिटवार (४३), निर्मला सुभाष कासिटवार व अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.