१४ गिट्टी क्रशर मशीनचे परवाने रद्द!
By Admin | Updated: May 20, 2017 00:49 IST2017-05-20T00:49:18+5:302017-05-20T00:49:18+5:30
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश: सरकारी जमिनीवर उत्खनन

१४ गिट्टी क्रशर मशीनचे परवाने रद्द!
खामगाव : तालुक्यातील पिंप्री देशमुख येथील शेतीसाठी देण्यात आलेल्या सरकारी जमिनीवर उत्खनन केल्याप्रकरणी १४ गिट्टी क्रशर मशिनीचे परवाने जिल्हा अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी रद्द केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यामधील अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतीसाठी देण्यात आलेल्या सरकारी जमिनीमध्ये उत्खनन होत असल्याने धुळीमुळे परिसरातील गावकरी, लहान मुले, वृद्ध व शेतकरी यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत बातम्या आल्याने प्रशासनाला जाग आली आणि १४ गिट्टी क्रेशर मशिनीचे परवाने रद्द करण्यात आले, तर लवकरच या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे संकेत जिल्हाधिकारी चंद्रशेखर पुलकुंडवार यांनी दिले आहे. गिट्टी क्रेशर बंदचे आदेश झाल्याने पिंप्री देशमुख येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून सरकारी जमिनीवर उत्खनन सुरू होते.