शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:02 IST

बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देबाष्पीभवनामुळे झपाट्याने घटजिल्ह्यातील ८१ लघुप्रकल्पांत ११.०६ दलघमी जलसाठा

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक नदी, नाले तसेच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता; मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा फटका बसण्यास सुरुवात झाली असून, बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी प्रमाणात वाढली होती. तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठ्यात कमी जास्त प्रमाणात वाढ झाली होती, त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटी काही गावात पाणीटंचाई जाणवू लागली होती; मात्र मागिल एका आठवड्यापासून विविध प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी १०.५३ टक्के जलसाठा होता. आता १०.२० टक्के जलसाठा आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी २२.३२ टक्के जलसाठा होता. आता २१.१७ टक्के जलसाठा आहे.  याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये आठ दिवसांपूर्वी १२.५५ टक्के जलसाठा होता. आता ११.६० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२.९२ जलसाठा आहे. ही १८.६४ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत १०.५३ दलघमी जलसाठा आहे. ही १७.५६ टक्केवारी आहे. तर खडकपूर्णा प्रकल्प कोरडा पडला आहे. 

एप्रिल-मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचे संकेत!यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मार्च महिन्यातच जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, वातावरणातील बदलाचाही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, त्यामुळे भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत.  आज रोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ८१ लघुप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये आठ दिवसांपूर्वी १४.२० टक्के जलसाठा होता. आता एकूण १३.४६ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.

पाणी बचतीच्या विविध योजना राबविण्याची गरजजिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून, विविध गावांना पाणी पुरवठा करणाºया योजनेच्या घशाला कोरड पडत आहे. यासाठी पाणी बचतीच्या योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी