१३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
By Admin | Updated: April 14, 2015 00:40 IST2015-04-14T00:40:34+5:302015-04-14T00:40:34+5:30
चिखली तालुक्यातील इसोली येथील घटना.

१३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
अमडापूर (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील इसोली येथील १३ वर्षीय मुलाचा इसोली शिवारातील धरणाखालील कुंडामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृतक परसराम अरुण कडोळे वय १३ वर्षे रा.इसोली हा काही मुलांसोबत ११ ए िप्रल २0१५ रोजी दुपारी २ वाजेला इसोली शिवारातील धरणाखाली कुंडावर गेला व या कुंडामध्ये पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या मृतकाला पाहणे नसल्याने मरण पावला, अशी माहिती अमडापूर पो.स्टे.ला तान्हाजी जिजेबा वाघटकर वय ३0 वर्षे रा.इसोली यांनी दिल्यावरुन र्मग नं.१४/0१५ कलम १७४ जा.फौ.प्रमाणे अकस्मीक मृत्यूची नोंद घेवून पुढील तपास ठाणेदार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.शे.अब्दुल हे करीत आहे. या मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावकर्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.