लक्झरी बसच्या अपघातात १३ प्रवासी जखमी

By Admin | Updated: December 23, 2015 02:21 IST2015-12-23T02:21:47+5:302015-12-23T02:21:47+5:30

खासगी लक्झरी बस खड्डय़ात उलटली; मेहकर डोणगाव रस्त्यावरील घटना.

13 passengers injured in a luxury bus accident | लक्झरी बसच्या अपघातात १३ प्रवासी जखमी

लक्झरी बसच्या अपघातात १३ प्रवासी जखमी

मेहकर (जि. बुलडाणा): पुणे ते यवतमाळकडे भरधाव वेगात जाणारी खासगी लक्झरी बस खड्डय़ात उलटल्याने २८ पैकी १३ प्रवासी जखमी झाले. ही घटना मेहकर डोणगाव रस्त्यावर क्रीडा संकुलसमोर पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, सर्व जखमींना तत्काळ स्थानिक ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची एम.एच.२९ एम.८३८६ क्रमांकाची लक्झरी ही यवतमाळकडे जात असताना मंगळवारी पहाटे डोणगाव रस्त्यावर क्रीडा संकुलसमोर बसचालक नशीर खान याला डुलकी आल्याने रस्त्याच्या खाली एका खड्डय़ात उलटली. यात एकूण २८ प्रवासी होते. बस उलटताच आत प्रवाशांची ओरड सुरू झाली. हा आवाज येताच रस्त्यावर पायदळी फिरण्यासाठी येत असलेल्या सुधीर सारोळकर, संतोष राणे, प्रकाश गायकवाड, विलास जवंजाळ, गजानन कुल्हाड, विशाल शिरपूरकर यांनी धाव घेऊन बसमध्ये अडकलेले प्रवाशांना बसमधून बाहेर काढले व यात जखमी झालेले प्रतिमा सोनवणे, वैशाली राऊत, वनमाला सिमके रा.कारंजा लाड, शेख रफिक शेख महमद रा. बाभूळगाव, राहुल बदकुले, ज्ञानेश्‍वर मेश्राम रा. यवतमाळ, अनिरुद्ध कावले रा.गोकुळ गोडेगाव ता.माहुर, अ.सईद अ.गणी, वैभव ढवळे रा.पुणे, प्रतीक गुगलीया, बस क्लिनर शे.रफिक व चालक नसीरखान रा. यवतमाळ यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राठोड, पी.एस. आय. चव्हाण पथकासह घटनास्थळावर हजर झाले होते.

Web Title: 13 passengers injured in a luxury bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.