दुसरबीडचे १३ सदस्य सहलीसाठी रवाना - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:03+5:302021-02-05T08:33:03+5:30

दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्यातील माेठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित ...

13 members of Dusarbeed leave for a trip - A | दुसरबीडचे १३ सदस्य सहलीसाठी रवाना - A

दुसरबीडचे १३ सदस्य सहलीसाठी रवाना - A

दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्यातील माेठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित पॅनलने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळविला आहे. सरपंचपद हे नामाप्रसाठी राखीव झाले आहे. महिला आरक्षण निघण्यापूर्वीच १३ सदस्य सहलीसाठी रवाना झाले आहेत. दुसरबीड ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये १७ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित पॅनलने जिंकून सत्ता मिळविली आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजप समर्थित पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. आता सरपंचपद निवडणुकीचे वेध सदस्यांना लागले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून २८ जानेवारी राेजी दुपारी राकाँ समर्थित पॅनलचे १३ सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. नवीन निवडून आलेल्या सदस्यांत सत्ता लालचा देऊन विरोधकांना फूट पडता येऊ नये, याची पूर्वखबरदारी म्हणून या सदस्यांना अज्ञातस्थळी पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीचेच होणार हे स्पष्ट आहे. तरीही राजकारणात वेळेवर काहीही हाेण्याची शक्यता असल्याने सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

Web Title: 13 members of Dusarbeed leave for a trip - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.