लाेणार तालुक्यात १३ जणांचा मृत्यू, ५३७ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:03+5:302021-04-27T04:35:03+5:30
लोणार : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ...

लाेणार तालुक्यात १३ जणांचा मृत्यू, ५३७ सक्रिय रुग्ण
लोणार : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर सध्या ५३७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत़.
सक्रिय रुग्णांमध्ये १८२ रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा, गृह अलगीकरणामध्ये २९५ तर कोविड सेंटरला ६० रुग्ण आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. लोणार शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. काेराेना रुग्णांचे लोण ग्रामीण भागातही झपाट्याने पसरत आहे. बिबी, सुलतानपूर, पिंपळनेर, धायफळ, सरस्वती, देऊळगाव, शारा, वडगाव, पिंपळखुटा, कोयाळी, किनगाव जट्टू, आरडव, सावरगाव, टिटवी, पांग्रा अशा व इतरही गावांमध्ये दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन चाचणी करणे, लक्षणे आढळताच संबंधित कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाढत चाललेली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या चिंतनीय आहे.